अधिवेशनाच्या मुद्द्यावरून 'मनसे'चा ठाकरे सरकारला सणसणीत टोला

Raj and Uddhav thackeray
Raj and Uddhav thackeray
Updated on

पावसाळी अधिवेशन केवळ दोन दिवसांचेच असल्याची सरकारची घोषणा

मुंबई: महाराष्ट्राच्या सरकारने यंदाचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Assembly Session) हे केवळ २ दिवसांचेच असल्याचे जाहीर केले. ५ आणि ६ जुलैला पावसाळी अधिवेशन होईल असं सांगण्यात आले. यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी तीव्र नाराजी (Angry) व्यक्त केली. 'एकीकडे राज्यातील विविध समाज आरक्षण (Reservation) आणि इतर प्रश्नांवर विशेष अधिवेशनाची मागणी करत असताना दुसरीकडे असलेले अधिवेशनच कमीत कमी कसे होईल याकडे सरकारचा कल आहे', अशी टीका भाजपने (BJP) केली. त्यानंतर मनसेचे (MNS) संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनीही या मुद्द्यावरून ठाकरे सरकारची खिल्ली उडवली. (Raj Thackeray led MNS Leader Sandeep Deshpande trolls CM Uddhav Thackeray Mahavikas Aghadi Govt)

Raj and Uddhav thackeray
माणुसकी खड्ड्यात... भाजप आमदाराचा संताप; ठाकरे सरकारवर टीका

शाळेत जाणारी मुलं ज्याप्रमाणे परिक्षा जवळ आली आणि अभ्यास झालेला नसेल तर परिक्षेला न जाण्यासाठी विविध बहाणे बनवतात. त्याचप्रकारे हे सरकारदेखील लोकांचे प्रश्न सोडवत नसल्यामुळे विरोधकांच्या प्रश्नांना सामोरं जायला घाबरते, असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला. "लहान असताना मुलांचा अभ्यास झाला नसेल तर परीक्षेला जाताना त्यांच्या पोटात दुखतं, नाही तर मग डोकं दुखतं. तस काहीसं महाविकास आघाडी सरकारचं झालं आहे. लोकांचे प्रश्न न सोडवल्यामुळे अधिवेशनच नको", अशा शब्दात देशपांडे यांनी सरकारची खिल्ली उडवली.

Raj and Uddhav thackeray
अत्यंत दुर्दैवी घटना आणि संतापजनक सारे -आशिष शेलार

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले...

"कोरोनाचा आजार अत्यंत गंभीर आहे यात दुमत नाही. पण कोरोनाचा बहाणा पुढे करून राज्याचे अधिवेशनच होऊ नये, अशा प्रकारचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. एकीकडे सरकारमधील एका पक्षाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला कितीही लोकं गेलेली चालतात, राज्यातील बारमध्ये कितीही लोक जाऊन बसलेली चालता... पण राज्याच्या विधीमंडळात कोरोनाच्या भीतीने अधिवेशन घ्यायचे नाही, अशी मानसिकता या सरकारची आहे. केवळ २ दिवसांचे अधिवेशन घेण्याची सरकारची तयारी आहे आणि आम्हाला हे मान्य नाही", अशा शब्दांत राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर तोफ डागली.

Raj and Uddhav thackeray
"कॅन्सरग्रस्तांच्या प्रश्नावर राजकारण व्हायला नको होते"

प्रवीण दरेकर म्हणाले...

"जनतेचे प्रश्न सरकार दरबारी मांडण्यासाठी तसेच लोकशाही मार्गाने ह्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी अधिवेशन हे एक माध्यम आहे! परंतु केवळ २ दिवसांचे अधिवेशन घेऊन औपचारिकता करण्याच्या तयारीत असलेल्या राज्य सरकारला जनतेच्या प्रश्नांना सामोरं जाण्याची भीती वाटतेय का?", असा सवाल राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विचारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.