मनसेच्या पाडवा मेळाव्यात राज यांची तुफान फटकेबाजी; वाचा सविस्तर

या मेळाव्यासाठी मनसेच्याकडून मोठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे sakal
Updated on

मुंबई : कोरोनाचे संकट ओसरल्यानंतर तब्बल दोन वर्षानंतर मनसेचा (MNS Gudi Padawa Melawa) गुढीपाडवा मेळावा मुंबईतील शिवाजी पार्क येथे दाखल झाले आहेत. या मेळाव्यामध्ये मनसेअध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) त्यांच्या आयोध्या (Ayodhya Tour) दौऱ्याची तारखी देखील जाहीर करण्याची शक्यता असून, या मेळाव्यासाठी मनसेच्याकडून मोठी जय्यत तयारी करण्यात आली असून, या मेळाव्याला संबोधित करताना राज ठाकरे नेमके कोणावर तोफ डागणार हे पाहणे महत्त्वाचे महत्त्वाचे ठरणार आहे.

राज ठाकरे यांचे शिवाजी पार्कवरील (Shivaji Park) भाषण ऐकण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा होण्यास सुरुवात झाली असून, यामध्ये ग्रामीण भागातील कार्यकर्ते संख्या लक्षणीय आहे. दरम्यान, तब्बल दोन वर्षांनंतर राज ठाकरे एवढ्या मोठ्या प्रमाणात सार्वजनिक मंचावर बोलणार आहे. त्यामुळे भाषणादरम्यान राज ठाकरे यांची तोफ नेमकी कुणावर धडाडणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. (Raj Thackeray Gudi Padwa Melawa)

यावेळी डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांची जयंती धुमधडाक्यात साजरी करा असे राज ठाकरे यांनी सांगितलं

बाळासाहेबांचे स्मारक बांधायचे तर मोठे बांधा असे म्हणत स्मारकासाठी मुंबईत यांना एकही प्लॉट सापडला नाही का? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

मशिदींवरील भोंग्यांवरून हल्लाबोल करत ते म्हणाले राज्य सरकारला हे भोंगे काढावेच लागतील आणि नाही काढले तर, मशिदींसमोर स्पिकर लावून हनुमान चालिसा लावली जाईल असा इशारा राज ठाकरे यांनी यावेळी दिला.

आमदारांना मोफत घरे देण्याच्या मुद्द्यावरुन हल्लाबोल करत याला सर्वात पहिले मनसेचे आमदार राजू पाटील यांनी विरोध केल्याचे राज म्हणाले.

जातीपातींमधून अडकून न राहण्याचा सल्ला देत हिंदू म्हणून आपण कधी एकत्र येणार ? असा सवाल करत ते म्हणाले की, जातीपातीतून बाहेर या तरच हिंदू ध्वज हाती घेता येईल असे राज ठाकरे म्हणाले.

राष्ट्रवादी पक्षाच्या जन्मानंतर राज्यात जातीपातीच राजकारण राज ठाकरेंचा हल्लाबोल करत जातीत बाहेर नाही पडलं तर, आपण हिंदू कधी होणार असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

उत्तर प्रदेशमध्ये विकास होतोय हे कळल्यानंतर मला आनंद झाला असे म्हणत राज ठाकरे म्हणाले की, उत्तर प्रदेशच्या जनतेनी विकासाला मत दिले आणि भाजपाने सत्ता स्थापन केली, असे राज ठाकरे यांनी यावेळी सांगत भाजपचे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतूक केले.

जो माणूस इतिहास विसरलेला आहे त्यांच्या पायाखालचा भूगोल हललेला आहे, असे म्हणत त्यांनी गृहमंत्र्यांच्या जेलमध्ये जाण्यावरून देखील जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी भुजबळांवर हल्लाबोल करत जेलमधून बाहेर आलेला व्यक्ती मंत्री होतो. मुंबईत बॉम्बस्फोट घडवणाऱ्या दाऊदशी संबंधांवरून नवाब मलिकांना अटक होते हे सगळे तुमच्या डोळ्यासमोर होतेय, असेदेखील राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

जिलेटीन प्रकरणावरून राज ठाकरेंची शिवसेनेवर टीका

अनिल अंबानींच्या घराबाहेर जिलेटीन ठेवणारा सचिन वझे जो एकेकाळी शिवसेनेत होता. हे सहज होतं का?, देशातल्या सर्वात मोठ्या उद्योगपतीच्या घराबाहेर जिलेटीन भरलेली गाडी ठेवणे इतके सोपंय का,” असा सवाल यावेळी राज ठाकरेंनी यांनी उपस्थित केला.

तीन नंबरचा पक्ष एक आणि दोन नंबरला फिरवतोय. महाराष्ट्राच्या जनतेशी तुम्ही काय बोलता. आधी शिव्या देतात आणि नंतर एकमेकांच्या मांडीवर बसतात. कारण सांगतात अडीच वर्षांचं तुमचं आतलं झेंगाट, आमच्याशी काय संबंध. ज्या मतदारांनी मतदान केलं ते युती म्हणून केलं. शरद पवार आणि काँग्रेससोबत जाण्यासाठी केलं नव्हतं. मतदारांशी गद्दारी करणाऱ्यांना कोणतं शासन देणार

मुख्यमंत्रीपद महाराष्ट्राचं मग चर्चा चार भिंतीत का केली? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आवाजाची मिमिक्री केली. अजितदादांची नक्कल करत राज ठाकरे म्हणाले, पळून कुणासोबत गेले? लग्न कुणाबरोबर केलं?

२०१९ मध्ये झालेली विधानसभेची निवडणूक आठवा. भाजपा- शिवसेना विरुद्ध काँग्रेस- राष्ट्रवादी अशी लढत होती. निकाल लागल्यानंतर शिवसेना, उद्धव ठाकरेंना साक्षात्कार झाला. अडीच अडीच वर्ष ठरली होती, आमच्याशी कधी बोलला नाही.. सभेत कधी बोललात नाही. मोदी भाषण करत असताना तुम्ही व्यासपीठावर होता. फडणवीसच मुख्यमंत्री असं मोदी, शाह म्हणाले होते. तेव्हा तुम्ही काही बोलला नाहीत. जसा निकाल लागला तेव्हा लक्षात आला की सरकार अडचणीत आलंय तेव्हा टुम काढली. अडीच वर्षांची

तीन वर्षांपूर्वी गुढीपाडवा मेळावा झाला होता. त्यानंतर दोन वर्ष मेळावा घेता आला नाही. कोरोना, लॉकडाऊन, तो काळ आठवला की त्रास होतो. आज गजबजलेलं शिवतीर्थ त्यावेळी सामसूम होती. एकतर कोरोनाची भीती किंवा पोलिसांचा दांडिया होता. त्या काळात पोलिसांनी जे काम केलंय त्यासाठी मुंबई, महाराष्ट्राच्या पोलिसांना मी धन्यवाद देईन. त्यांनी कोरोनाचा विचार न करता २४ तास रस्त्यावर उतरून काम केलं. मोरी इतकी तुंबलीये. बोळा कुठून घालावा हेच कळत नाही. जितकं शक्य होईल तेवढं आज साफ करु. संपूर्ण समाजात आलेलं नैराश्य झटकून आता सगळे कामाला लागलेत. लॉकडाऊन, घरात बसणं विस्मरणात गेलं ही चांगली गोष्ट. आज फ्लॅशबॅक देऊया. दोन वर्ष शांततेत गेली, घरात बसून होतो, रोज नवीन बातम्यांमुळे अगोदरच विसरायला होतं.

कोरानाकाळत चोवीस तास काम करणाऱ्या मुंबई पोलिसांचे राज ठाकरे यांच्याकडून कौतुकाची थाप. जसे कोरोना निर्बंध, लॉकडाऊन आपल्या विस्मरणात गेल्या आहेत. ही चांगली गोष्ट आहे. मात्र, कोरोनापूर्वीच्या घटनादेखील नागरिकांच्या विस्मराणात गेल्या आहेत आणि हेच राजकारण्यांच्या फायद्याचे ठरते असे राज ठाकरे म्हणाले.

बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) म्हणाले की, वेगवेगळ्या दिशा, वेगवेगळ्या विचारधारा असलेल्या राज्यातील तीन पक्षांचे एकमेकांशी पटत नाहीये. एवढेच काय तर, आमदारांचे, मुख्यमंत्र्यांचे कोणाचेच कोणाशी पटत नाहीये. याचा फटका राज्यातील नागरिकांना आणि महाराष्ट्राच्या विकासाला बसत आहे. यामुळे महाराष्ट्राचा विकास होत नसल्याची टीकादेखील नांदगावकर यांनी महाविकास आघाडीवर केली आहे. तसेच टायगर अभी जिंदा है...काळजी करण्याचे कारण नाही असेही बाळा नांदगावकर यांनी उपस्थितांना सांगितले.

मनसेच्या मराठी मुद्द्यावरून केलेल्या आंदोलनामुळे राज्यात अनेक गोष्टी मराठीत सुरू झाल्या. राज्यातीस 65 टोल नाकेदेखील राज ठाकरे यांच्यामुळे बंद झाल्याचे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले.

कोरोना काळातील राज्य सरकारच्या नियोजनावर मनसे आमदार यांचा हल्लाबोल. ते म्हणाले की, "लोक 'मन की बात' ऐकतात की नाही..."; पण लोक राज ठाकरेंना नक्की ऐकतात”, असे म्हणत राजू पाटील यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला.

राज ठाकरे यांचे शिवाजी पार्कवरील भाषण ऐकण्यासाठी हजारो मनसैनिक दादर येथील शिवसेना भवनासमोरून वाज गाजत मिरवणूक काढत शिवाजी पार्ककडे दाखल होत आहे.

शिवाजी पार्ककडे येणाऱ्या रस्त्याकडे येणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने शिवाजी पार्ककडे येणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. यामध्ये अनेक कार्यकर्ते अडकले असून, राज ठाकरे यांचे भाषण साधारण 7.45 ते 08.00 च्या दरम्यान सुरू होईल असे, शिवाजी पार्कवर उपस्थित असलेल्या मनसे नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.