Raj Thackeray: एकमेव आमदारासाठी राज ठाकरे उतरले मैदानात, निवडणूक कार्यालयाचे होणार उद्घाटन

Latest Dombivali News: 5 वर्षे ते राज्याच्या सत्तातरात पक्षाची महत्वाची भूमिका बजावत आहेत.
Raj Thackeray: एकमेव आमदारासाठी  राज ठाकरे उतरले मैदानात, निवडणूक कार्यालयाचे होणार उद्घाटन
Updated on

Latest Thane News: देशात कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाची एक वेगळीच ओळख मनसेमुळे निर्माण झाली आहे. या मतदारसंघात मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे 2019 मध्ये निवडून आले आहेत.

2024 मध्ये देखील पक्षासाठी निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी त्यांनी केली असून आपल्या या एकमेव खास अशा आमदारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज डोंबिवलीत येणार आहेत. मनसे निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन राज यांच्या हस्ते सायंकाळी होणार आहे. यानिमित्ताने शहरात मोठी बॅनर बाजी देखील करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजले असून सर्व पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ हा एकमेव मतदारसंघ मनसेच्या वाट्याला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे एकमेव आमदार कल्याण ग्रामीण मधून निवडून आले. आमदार राजू पाटील येथील आमदार असून गेले 5 वर्षे ते राज्याच्या सत्तातरात पक्षाची महत्वाची भूमिका बजावत आहेत.

Raj Thackeray: एकमेव आमदारासाठी  राज ठाकरे उतरले मैदानात, निवडणूक कार्यालयाचे होणार उद्घाटन
Raj Thackeray: टोल माफी आमचीच मागणी होती...राज ठाकरेंचा शंखनाद! विधानसभेच्या पार्श्वभूमीवर स्पष्ट केली भूमिका
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.