Mumbai: आजपर्यंत जे आमदार, खासदार झाले त्यांना प्रश्न विचारा. आता जे हात जोडून मत मागायला येतात ते निवडून आल्यावर पाच वर्षे फिरकतदेखील नाहीत. त्यांना कोणतीही भीती राहिलेली नाही.
मतदार आपल्याला प्रश्न विचारतील, अशी त्यांना भीती वाटली पाहिजे. आता बाळासाहेब ठाकरे आणि नरेंद्र मोदींच्या नावाने मते मागितली जातात. बोरिवलीचे प्रश्न काय नरेंद्र मोदींना सांगणार काय, असा चिमटा राज ठाकरे यांनी काढला.