Raj Thackeray With Bjp: भाजप खासदाराच्या पोस्टरवर झळकले मनसे अध्यक्ष राज ठाकरे; पोस्ट झाली व्हायरल

हे पोस्टर समाज माध्यमातून व्हायरल होत असून मनसेच्या पाठिंब्याची चर्चा होत आहे. | Raj Thackeray With Bjp: MNS President Raj Thackeray spotted on poster of BJP MP; The post went viral
Raj Thackeray With Bjp: भाजप खासदाराच्या पोस्टरवर झळकले मनसे अध्यक्ष राज ठाकरे; पोस्ट झाली व्हायरल
Updated on

Dombivali News: भिवंडी लोकसभेचे भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्या जाहिर मेळावाच्या पोस्टरवर थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे आमदार राजू पाटील यांचा फोटो लागला आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला पाठिंबा जाहीर केल्याने भाजपने आता मनसेला आपल्या प्रचारात सहभागी करून घेतल्याचे बोललं जातं आहे. हे पोस्टर समाज माध्यमातून व्हायरल होत असून मनसेच्या पाठिंब्याची चर्चा होत आहे.

Raj Thackeray With Bjp: भाजप खासदाराच्या पोस्टरवर झळकले मनसे अध्यक्ष राज ठाकरे; पोस्ट झाली व्हायरल
Raj Thackeray : उत्कंठेच्या धगीवर राज यांचा अपेक्षित निर्णय! राजकीय वर्तुळात फारशी चर्चा नाही, माध्यमांनीच ताणली उत्सुकता

भाजपने मनसे अध्यक्ष, आमदार यांचे फोटो बॅनरवर झळकवले तरी राज यांच्या भूमिकेमुळे दुखावलेले कार्यकर्ते आणि पदाधिकारी भाजपला किती मदत करणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. लोकसभा, राज्यसभा, विधान परिषद असं काहीही नको, फक्त नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान व्हावेत, त्यांच्यासारखं कणखर नेतृत्व देशाला पुन्हा मिळावं म्हणून मी पाठिंबा जाहीर करतो, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Raj Thackeray With Bjp: भाजप खासदाराच्या पोस्टरवर झळकले मनसे अध्यक्ष राज ठाकरे; पोस्ट झाली व्हायरल
Raj Thackeray: गेल्या १८ वर्षात मनसेच्या इंजिनाचे तब्बल इतक्या वेळा बदलला ट्र्रॅक! वाचा सविस्तर

त्यानंतर महायुतीतल्या नेत्यांनी त्यांचे आभार मानले आहेत. तर महाविकास आघाडीने राज ठाकरेंवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. अशातच राज ठाकरेंना त्यांच्याच पक्षातून धक्के बसू लागले आहेत. राज ठाकरेंची भूमिका अनाकलनीय आहे असं म्हणत मनसे नेते कीर्तिकुमार शिंदे यांनी मनसेला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ केला आहे.त्यानंतर डोंबिवली मनविसे शहर संघटक मिहीर दवते यांनी सुद्धा पक्षाचे काम थांबवण्याचा निर्णय घेतला आहॆ.

तर दुसरीकडे भाजपचे भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांच्या जाहिर मेळावाच्या पोस्टरवर थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसे आमदार राजू पाटील यांचा फोटो लावण्यात आला आहे. मनसेला भाजपने पक्षाच्या बॅनरवर स्थान दिले असले तरी राज यांच्या भूमिकेने दुखावलेले पदाधिकारी, कार्यकर्ते काय भूमिका घेतात हे पहावे लागेल.

दरम्यान हे पोस्टर व्हायरल झाले असून मनसेच्या पाठींब्यांची चर्चा सुरु झाली आहॆ, असे असलेही तरी मनसे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपच्या उमेदवाराला सपोर्ट करणार का आणि पाठींबा देणार का? हे पहावे लागेल...

Raj Thackeray With Bjp: भाजप खासदाराच्या पोस्टरवर झळकले मनसे अध्यक्ष राज ठाकरे; पोस्ट झाली व्हायरल
Raj Thackeray : ‘केवळ मोदींसाठी महायुतीला पाठिंबा’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.