मुंबई : ग्रामीण भागातील (rural area) मानसिक आरोग्यावर (mental health) अधिक लक्ष देणे ही काळाची गरज (recent time need) असून आरोग्य विभागाच्या (health department) जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत मानसिक आरोग्याच्या समस्यांवर (health problems) उपचारासोबतच जाणीवजागृतीवर भर दिला जाणार आहे. त्यासाठी ‘एमपॉवर’ संस्थेच्या सहकार्यातून जालना जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर प्रकल्प (project) राबवण्यात येत असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी सांगितले.
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात एमपॉवर या मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेमार्फत ग्रामीण मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात जाणीवजागृती, प्रशिक्षण आणि उपचारासाठीचा प्रायोगिक तत्वावर ‘संवेदना’ हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ आज आरोग्यमंत्री आणि जालन्याचे पालकमंत्री टोपे यांच्या हस्ते करण्यात आला.
आरोग्यमंत्री टोपे यावेळी म्हणाले, बदलती जीवनशैली, स्पर्धात्मक युग यामुळे मानसिक आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. कोरोनामुळे तर मानसिक आरोग्याचे मोठे आव्हानच उभे ठाकले आहे. शहरी भागात मानसिक आजाराबाबत काहीशी जागरूकता आढळून येते मात्र ग्रामीण भागात त्याविषयी अधिक जाणीवजागृीत कार्यक्रम हाती घेणे आवश्यक आहे. आरोग्य विभागामार्फत राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम राबवला जात आहे. त्याला बळकटी देण्यासाठी एम्पॉवर सारख्या संस्थांची मदत होणार आहे. मानसिक आरोग्यावर भर देतानाच मानोसोपचार तज्ञांची आणि मानोसपचार शास्त्रज्ञांची संख्या वाढविण्याची गरज असल्याचे टोपे यांनी सांगितले.
एम्पॉवर संस्थेच्या बिर्ला म्हणाल्या, एम्पॉवर संस्था मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. मानिसक आरोग्याविषयी विशेषता ग्रामीण भागात जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी संस्थेमार्फत जाणीवजागृती उपक्रम, आरोग्य यंत्रणेची क्षमता बांधणी, तज्ञांकडून प्रशिक्षण आदी उपक्रम राबवण्यात येणार आहेत. जालना जिल्ह्यातील प्रकल्पाच्या यशस्वीतेनंतर संपूर्ण राज्यभर हा प्रकल्प राबवण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते ‘संवेदना’ प्रकल्पाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.