कोरोनाची 'उलटी गिनती' कधी सुरु होणार? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केला 'मोठा' खुलासा...

कोरोनाची 'उलटी गिनती' कधी सुरु होणार? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी केला 'मोठा' खुलासा...
Updated on

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोना संदर्भात एक अत्यंत महत्त्वपूर्ण विधान केलंय. ऑगस्ट महिन्यात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसतील मात्र सप्टेंबर महिन्यात कोरोनाची उलटी गिनती म्हणजेच कोरोना रुग्णसंख्या कमी-कमी होताना पाहायला मिळेल असं म्हटलंय. सध्या मुंबई, मुंबई मेट्रो पॉलिटन रिजन म्हणजेच ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, मिरा भाईंदर हे भाग आणि सोबतच पुण्यात कोरोनाचे जास्त रुग्ण आहेत. मात्र राज्यातील मोठ्या 'हॉटस्पॉट'मध्ये पुढील आठवडाभरात रुग्ण संख्या कमी होताना पाहायला मिळेल असंही राजेश टोपे म्हणालेत.

अजूनही मुंबई आणि पुण्यात रुग्णवाढीचा दर सर्वाधिक आहे. मात्र सध्या समोर येणारे आकडे हा कोरोनाचा 'पीक पॉईंट' म्हणजेच कमाल प्रमाण आहे. येत्या काळात, पुढील आठ दहा दिवसात मुंबईतील आणि पुण्यातील कोरोना रुग्णवाढ कमी होताना पाहायला मिळेल. रुग्ण वाढ कमी होताना पाहायला जरी मिळाली तरीही कोरोना संपूर्णपणे नाहीसा व्हायला आणखी काही काळ जाईल असंही राजेश टोपे म्हणालेत. साधारणतः एखाद्या शहरात २० ते २५ टक्के लोकांना कोरोना लागण झाल्यास तिथली रुग्णवाढ कमी होताना पाहायला मिळते असं निरीक्षण असल्याचं टोपे  म्हणालेत.

कसा आहे महाराष्ट्रातील कोरोनाचा ट्रेंड 

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येचा ट्रेंड हा प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळा आहे. त्यामुळे याला आपण संमिश्र ट्रेंड म्हणून शकतो. एखाद्या जिल्ह्यातील एकूण रुग्ण आणि तिथलं मृत्यूचं प्रमाण विभिन्न आहे. विदर्भातील एकूण ११ जिल्ह्यांपैकी अकोला आणि अमरावती मधील रुग्णसंख्या आणि मृत्युदरात उत्तर महाराष्ट्राशी साम्यता आहे. मात्र एकंदर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण वेगळं असल्याचं निरीक्षण अधिकारी डॉक्टर प्रदीप आवटे यांनी सांगितलं. डॉक्टर प्रदीप आवटे यांनी कोरोनासंदर्भातील अत्यंत तुणतागुंतीची माहिती दिली. 

आरोग्यमंत्री राजेश टोपे, कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी, निरीक्षण अधिकारी डॉक्टर प्रदीप आवटे आदी मान्यवरांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना ही माहिती दिली आहे. 

rajesh tope says countdown in covid patient figures will start from September 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.