गावांतून निधी आला पण विकास मात्र झाला नाही; राजू पाटील यांचा आरोप

Raju Patil
Raju Patilsakal media
Updated on

डोंबिवली : 27 गावांतील रस्त्यांची कामे (villages road work) पालिकेने (KDMC) केलीच नाहीत. ग्रामपंचायत आणि एमएमआरडीएच्या (mmrda) माध्यमातून या रस्त्यांची कामे झाली तेवढीच. निळजे ग्रामपंचायतीकडून (nilje gram panchayat) 15 कोटी निधी (fifteen crore fund) पालिकेला मिळाला. अशा पद्धतीने 27 ग्रामपंचायतींकडून निधी आले असतील आणि तेथे 2 कोटी पण खर्च केले गेले नाही तर जनता नाराज होणारच आहे. गावांतून निधी आला मात्र विकासच झाला नाही (no development), असा आरोप कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी केडीएमसी प्रशासनावर (KDMC) केला.

Raju Patil
आयडॉल : उद्यापासून पदवी व पदव्युत्तर प्रथम वर्ष अभ्यासक्रमाचे प्रवेश

कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी मंगळवारी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातील कल्याण डोंबिवली महापालिके अंतर्गत येणाऱ्या विकास कामांविषयी चर्चा करण्यासाठी आमदार पाटील यांनी आयुक्त डॉ. सुर्यवंशी यांची वेळ मागितली होती. त्यानुसार मंगळवारी ही बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी सुमारे 18 कामांवर चर्चा झाली. त्यानंतर आमदार पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना प्रशासनावर वरील आरोप केले. गेल्या 2 वर्षात 27 गावातील रस्त्यांची कामे झाली नसल्याने रस्त्यांची अवस्था बिकट आहे.

त्यातच गावांचा प्रश्न हा न्याय प्रविष्ट असल्याने सध्या गावांकडे कोणाचेच लक्ष नाही. याविषयी आमदार पाटील म्हणाले, 27 गावे महापालिकेत आल्यानंतर त्यांचा विकास काय झाला हे प्रशासनाने दाखवावे. आज कल्याण मध्ये फुलपाखरू गार्डन बनविले जाते. निळजे गावातील तलावावर विदेशी पक्षी येतात, त्यांना पाहण्यासाठी पर्यटक गावात येतात. या गावातील रस्त्याची अवस्था पहा. निळजे गाव पालिकेत आल्यानंतर ग्राम पंचायत जवळ असलेला निधी पालिकेकडे हस्तांतरित झाला. आशा पद्धतीने 27 गावांचा निधी पालिकेला मिळाला आहे.

Raju Patil
दिव्यांगांची फरपट थांबणार! मोखाड्यात दोन दिवसांचे शिबिर

मात्र गावांत काहीच विकास कामे झाली नाही तर नागरिक त्रस्त होणारच आहेत. 27 गावात रस्त्याची कामे झाली आहेत, किंवा 2 वर्षे केली नाहीत हे प्रशासनाचे म्हणनेच चुकीचे आहे, इथे कामेच झालेली नाहीत असे आमदार पाटील यांनी पालिका प्रशासना विरोधात ठासून सांगितले. भाजपा आमदार रविंद्र चव्हाण यांनी रस्त्यांच्या कामासाठी हिवसेनेकडून निधी दिला जात नाही ही अत्यंत दुर्भाग्याची बाब असल्याची खंत व्यक्त केली होती.

यावर मनसे आमदार पाटील यांनीही ही खरेच दुर्भाग्याची गोष्ट असल्याचे सांगितले. निवडणुका आल्या की यांचे बॅनर लागतात कोटी आले, पण ते कोटी गेले कोठे? एमआयडीसीतील बॅनर फाटायला आले मात्र त्याची अजून निविदा प्रक्रिया देखील सुरू झाली नाही. फेब्रुवारीपर्यंत ते काही सुरू होत नाही असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.