Rajya Sabha Election: पुढील महिन्यात होणाऱ्या राज्यसभेच्या सहा जागांसाठीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला दोन जागांसाठी प्रचंड मेहनत करावी लागणार आहे. राज्यसभा निवडणुकीत मतदान खुले असल्याने पक्षादेश महत्त्वाचा ठरणार आहे.
त्यातच, महाआघाडीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीमुळे महाविकास आघाडीला मतांची जुळवाजुळव करणे अवघड आहे. राज्यातील सहा जागापैकी सहकारी पक्षांच्या मदतीने पाच जागा जिंकण्यासाठी भाजपकडून रणनीती आखण्यात येणार आहे.
त्याचवेळी महाविकास आघाडीला दोन जागा जिंकण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे विधानसभेची एक जागा रिक्त आहे. कॉंग्रेसचे आमदार सुनील केदार यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली असल्याने त्यांनाही मतदान करता येणार नाही. त्यामुळे २८६ आमदार मतदान करतील.
या निवडणुकीत विजयासाठी ४२ मतांचा कोटा आवश्यक आहे. ठाकरे गटाकडे १५ ते १६ तर शरद पवार यांच्या गटाकडे ११ आमदार आहेत. त्यामुळे, या दोन्ही गटांना निवडणुकीत विजयाचे गणित जमविणे अवघड आहे. अशातच शिंदे गटाचा व्होप लागू होणार असल्याने ठाकरे गटाची कोंडी होणार आहे.
राज्यसभेवर जाण्याबाबत आपले नाव ज्यांनी जाहीर केले त्यांचा मी आभारी आहे,' असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी, 'आपण लोकसभेसाठीही इच्छुक आहोत,' असे म्हटले आहे. सुनील तटकरे यांचे नाव राज्यसभेसाठी चर्चेत असल्याचे वृत्त 'सकाळ'ने प्रसिद्ध केले होते.
त्याबाबत उत्तर देण्याचे टाळत ते म्हणाले, "मी प्रतिकूल परिस्थितीत प्रवाहाच्या विरोधात जाऊन लोकसभा निवडणूक लढविली आहे. एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेल्या एका दिग्गज नेत्याचा प्रचंड मताधिक्याने पराभव करून निवडून आलो आहे. त्यामुळे मी लोकसभेसाठी आताही इच्छुक आहे. मात्र, अंतिम निर्णय महायुतीचे नेते घेतील, त्यांचा निर्णय मला मान्य असेल.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.