Railway: रेल्वे महाव्यवस्थापक झाले पक्के मुंबईकर; गर्दीतून अचानक प्रवास !

Mumbai LOcal: प्रवाशांच्या तक्रारी आणि अडचणी जाणून घेतल्या !
Railway: रेल्वे महाव्यवस्थापक झाले पक्के मुंबईकर; गर्दीतून अचानक प्रवास !
Updated on

Railway: मध्य रेल्वेच्या नवे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी पदभार स्वीकार केल्यापासून कामाचा धडका लावला आहे. बुधवारी कोणालाही कळू न देता, त्यांनी लोकल गर्दीतून प्रवास करून प्रवासाच्या समस्या आणि अडचनी जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे. यादरम्यान त्यांनी ठाणे स्थानकांतील स्टेशन मास्तर आणि आरपीएफ पोसिस ठाण्याची पाहणी केली आहे.

भारतीय रेल्वे अभियांत्रिकी सेवेचे वरिष्ठ अधिकारी राम करण यादव यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणून शुक्रवारी पदभार स्वीकारला. तेव्हापासून कामाचा धडाका लावला आहे. पहिल्याच दिवशी अचानक ऑपरेशन नियंत्रण कार्यालयात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आल्याने रेल्वे अधिकारी वर्गात खळबळ उडाली होती.

Railway: रेल्वे महाव्यवस्थापक झाले पक्के मुंबईकर; गर्दीतून अचानक प्रवास !
Mumbai Local News: मेगाब्लॉकमुळे मुंबईकरांचे मेगाहाल !

तसेच पाचही विभागाच्या अधिकारी वर्गाच्या पहिल्याच दिवशी बैठका घेण्याचे सत्र सुरु केले आहे. बुधवारी कोणालाही न कळवता, बुधवारी सीएसएमटी -ठाणे-सीएसएमटी दरम्यान लोकल प्रवास केला. सर्व प्रथम महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी बुधवारी सकाळी सीएसएमटी ते ठाणे लोकल प्रवास सीएसएमटी ते कसारा जलद लोकलच्या मोटरमन कॅबमधून केला.

यावेळी त्यांनी स्टेशन्स,रुळांची स्वच्छता आणि ट्रेसपासिंगची समस्या जाणून घेतली. त्यानंतर परतीचा ठाणे ते सीएसएमटी प्रवास ठाणे ते दादर धिम्या लोकलच्या सेण्कड क्लासच्या डब्यातून केला. यावेळी त्यांनी डब्यातील प्रवाशांशी संवाद साधला.लोकलमधील अनाऊंसमेंट सिस्टम आणि डिस्प्ले बोर्ड तपासले. ठाणे स्थानकाची पाहणी केली.

Railway: रेल्वे महाव्यवस्थापक झाले पक्के मुंबईकर; गर्दीतून अचानक प्रवास !
Mumbai Local : १५ दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास लोकशाही मार्गाने उपोषणाचा इशारा

या पाहणीदरम्यान स्टेशन आणि टॉयलेट ब्लॉकची तपासणी करुन यूटीएस काउंटरवरील प्रवासी आणि एटीव्हीएम फॅसिलिटेटरशी संवाद साधला. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या दादर स्थानकात गर्दी नियंत्रणासाठी केलेल्या व्यवस्थेचीही पाहणी केली. स्थानकातील विविध सुरक्षा व्यवस्था, गर्दीचे निरीक्षण केले. त्यानंतर दादर ते सीएसएमटी लोकलने सीएसएमटी स्थानकापर्यत प्रवास केला.

पहिल्यांदाच अशी तपासणी -

मध्य रेल्वेमध्ये अनेक महाव्यवस्थापक आले. परंतु, राम करण यादव हे पहिले असे महाव्यस्थापक आहे. जे कोणालाही न कळवता आपली सुरक्षा यंत्रणा बाजूला ठेवून चक्क लोकलचा गर्दीमधून प्रवास केला आहे, यापूर्वी अनेक महाव्यस्थापकांनी लोकल प्रवास केला आहे. परंतु, त्यांच्या बरोबर रेल्वे अधिकारी वर्गाच्या फोजफाटा असायचा.

Railway: रेल्वे महाव्यवस्थापक झाले पक्के मुंबईकर; गर्दीतून अचानक प्रवास !
Mumbai Local Train: मुंबईकरांना दिलासा! मध्य रेल्वेचा रविवारचा मेगाब्लॉक रद्द!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.