Uddhav Thackeray : "भाजपनं हिंदुंची माफी मागितली पाहिजे"; राणेंच्या शंकराचार्यांवरील विधानावरुन ठाकरे आक्रमक

राणेंनी शंकराचार्यांवर टिप्पणी केल्यानंतर पुन्हा घुमजाव केलं आहे. पण यावरुन त्यांना टिकेला सामोरं जावं लागतं आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray
Updated on

मुंबई : नारायण राणे यांनी नुकतीच शंकराचार्यांवर एक टिप्पणी केली होती. यावरुन शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी त्यांवर हल्लाबोल केला आहे. भाजप यांना पक्षातून काढून का टाकत नाही? असा सवाल करत याप्रकरणी भाजपनं हिंदुंची माफी मागितली पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे. (Ram Temple BJP should apologize to Hindus says Uddhav Thackeray aggressive over Narayan Rane statement on Shankaracharya)

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं होतं की, बाबरी किंवा राम मंदिराच्या लढ्यात शिवसेनेचं योगदान काय? तुम्ही तेव्हा हाफपँटमध्ये होतात. त्यानंतर आज सुक्ष्म आणि लघू म्हणाले की शंकराचार्यांचं हिंदुत्वामध्ये योगदान काय? लाज नाही वाटतं? एकतर स्वतःचे फोटो छापता मोदी सरकारची गॅरंटी. तुम्हाला शंकराचार्यांचा मान राखायचा नसला तरी शंकराचार्यांचा हिंदुत्वात योगदान काय असं विचारता? आणि तुमच्याशी आम्ही हिंदुत्वासाठी युती करु.

पण आम्ही कुठे काय म्हटलं की लगेच अपमान अपमान बोंबलता. मग माझं आज जाहीर त्यांना आवाहन आहे की, त्यांनी राम मंदिराच्या लोकार्पणाआधी हिंदुंची माफी मागावी. कारण शंकराचार्य आले तर तिथं त्यांचे फोटो लागणार माझे फोटो कसे येणार? त्यांचा मानसन्मान ठेवता येत नसेल तर तुम्ही त्यांचं योगदान विचारता तर तुमची लायकी काय?

म्हणून राम मंदिराचं उद्घाटन होताना भाजप यांना काढणार आहे की नाही? कारण हे सुद्धा गद्दारच आहेत. पण शंकाराचार्यंचं योगदान विचारण्यापूर्वी भाजपनं पहिली हिंदूंची माफी मागितली पाहिजे. कारण राम मंदिराचं लोकार्पण होतंय तर आम्ही देखील त्यात सहभागी आहोत आम्हाला सुद्धा आनंद आहे. आम्ही अपशकुनी नाही आहोत, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंवर आणि भाजपवर हल्लाबोल केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()