Latest Mumbai News: रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाला काही जागा सोडण्याबाबत चर्चा केली. यावेळी पाच ते सहा जागा पक्षासाठी सोडण्यात याव्यात, अशी आग्रही मागणी रामदास आठवले यांनी फडणवीस यांच्याकडे केली आहे.
यावेळी झालेल्या चर्चेत रिपब्लिकन पक्षाला निश्चितच जागा सोडणे गरजेचे आहे. त्याबाबत महायुतीतील तीन मोठ्या पक्षांसोबत बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठवले यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाला दिले.