राणेंना मंत्रीपद लाभले नाही,त्यांनी राजिनामा द्यावा हे उत्तम : सिद्धेश कदम यांचा टोला

भाजप नेते नारायण राणे यांना केंद्रात मंत्रीपद मिळाल्यानंतर काही आठवड्यांतच त्यांना अटक
mumbai
mumbaisakal
Updated on

मुंबई : भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांना केंद्रात मंत्रीपद मिळाल्यानंतर काही आठवड्यांतच त्यांना अटक (arrest) झाली आहे. त्यामुळे त्यांना हे मंत्रीपद लाभत नाही हे सिद्ध झाल्याने त्यांनी तत्काळ मंत्रीपदाचा (Minister) राजिनामा (Resigned) द्यावे हे उत्तम, असा टोला युवासेना (Yuva Sena) कार्यकारिणी सदस्य सिद्धेश कदम (Siddhesh Kadam) यांनी लगावला आहे.

कोणतीही गोष्ट करताना मुहूर्त पाहून, शुभ-अशुभ पाहण्याची भाजप नेत्यांना सवय आहे. राणे यांनी कोणत्या मुहूर्तावर मंत्रीपदाची शपथ घेतली होती, हे ठाऊक नाही. मात्र मंत्रीपद मिळाल्यावर अजून दोन महिनेही होत नाहीत तोच त्यांच्यावर अटकेत जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्रीपद त्यांना अशुभ ठरल्याचे दिसते आहे. अशा स्थितीत त्यांनी मंत्रीपदाचा त्याग करून आयुष्यभर भाजपचा सामान्य कार्यकर्ता म्हणून जनसेवा करावी, असेही कदम यांनी सुनावले आहे.

mumbai
भाजप व संघाच्या ताकदीमुळे निवडून आलात हे ध्यानात ठेवावे; भाजपनेत्याचा खडसेंना टोला

अती तेथे माती हे साऱ्यांनीच ध्यानात ठेवले पाहिजे. रोज उठसूठ सहपरिवार समाजमाध्यमांवरून किंवा जाहीरपणे सर्वांवर टीका करणाऱ्यांनी आपल्या तोंडून एकही उणाअधिक शब्द बाहेर पडणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. एका शब्दामुळे आपली आयुष्यभराची पुण्याई मातीमोल होऊ शकते, बूंदसे गई वो हौदसे नही आती हे आपल्या पूर्वजांनीच सांगून ठेवले आहे. पेरावे ते उगवते, बोलल्यासारखे उत्तर येते, मग कर्कश्य बोलणे का करावे, हे समर्थ रामदासस्वामींनी सांगितले आहे. शब्द तोलूनमापून वापरावेत असेही अनेक संत महात्म्यांनी लिहून ठेवले आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी असल्याने महाराष्ट्राचे नेते म्हणवणाऱ्यांनी तर हे यापुढे कायमचे ध्यानात ठेवले पाहिजे.

शिवसेनेला त्रास देण्यासाठी राणे यांना मंत्रीपद दिले आहे, असेही बोलले जात आहे. आपले काम जरुर करावे, तरीही न्यायबुद्धी, सत्य, निती यांचे तारतम्य सोडू नये, असेही कदम यांनी बजावले आहे.

राणे हे अभ्यासू नेते आणि वक्ते म्हणून विधीमंडळात परिचित होते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांसंदर्भात असे वक्तव्य त्यांच्याकडून अपेक्षित नव्हते. शिवसेनेचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या हातूनही कळत नकळत लहानमोठ्या चुका झाल्याच असणार. राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी त्याबद्दल राणे यांची जाहीर भाषणातून खिल्लीही उडवली होती. त्यामुळे चुका सर्वचजण करतात, पण चूक होत असल्याची शंका येताच ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न करणे हेच चांगले लक्षण आहे, हे राणे यांनी ध्यानात ठेवावे. चूक सुधारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल राज्याच्या सर्वोच्च नेतृत्वावर चुकीच्या पद्धतीने टीका तर करूच नये, असेही कदम यांनी सुनावले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.