भायखळ्याच्या राणीच्या बागेचे बदलते रूप भावले...

पर्यटकांना नवीन पाहुण्यांची भुरळ; गर्दी वाढली
Rani Baug Zoo newcomers animal bird Tourists attracted mumbai
Rani Baug Zoo newcomers animal bird Tourists attracted mumbaisakal
Updated on

मुंबई : भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाने (राणीची बाग) कात टाकल्यानंतर या ठिकाणी नवीन पाहुणेही दाखल झाले. या नवीन पाहुण्यांच्या दर्शनासाठी राज्य, तसेच देशभरातील पर्यटकांची राणीबागेत गर्दी उसळत आहे. दररोज सरासरी १३ हजार पर्यटक उद्यानात येत असून, सुट्यांच्या दिवशी तर ही संख्या २५ हजारांच्या पार जात असल्याचे उद्यान प्रशासनातर्फे सांगण्यात आले. कोरोना काळात बंद असलेले जिजामाता उद्यान सुरू झाल्यानंतर या उद्यानात अनेक बदल करण्यात आले. आधुनिक पिंजरे, पाण्याची व्यवस्था, प्राणी आणि पक्ष्यांना विहार करण्यासाठी विशेष जागा तयार करण्यात आल्या आहेत. यानंतर उद्यानात नवीन प्राण्यांचे आगमनही झाले आहे.

सध्या पेंग्विनसोबत, बाराशिंगा, तरस, अस्वल, बिबट्या, वाघ आदींना पिंजऱ्यात ठेवले असून, या सर्वांचे दर्शन घेण्यासाठी, त्यांची कॅमेरात छबी टिपण्यासाठी पर्यटकांची चढाओढ सुरू असते. प्राण्यांसोबत पक्ष्यांसाठी देखील उद्यानात अत्याधुनिक पिंजरे उभारले आहेत. यातील विशेष बाब म्हणजे उद्यानातील रॉयल बंगाल वाघांची जोडी आणि पेंग्विन्स पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत.

उद्यान-प्राणिसंग्रहालयाची संपदा

  • १३ जातींचे ८४ सस्तन प्राणी

  • १९ जातींचे १५७ पक्षी

  • ७ जातींचे ३२ सरपटणारे/जलचर प्राणी

  • एकूण २७३ प्राणी/पक्षी अस्तित्वात

  • विविध ३० प्रजातींचे २५० पक्षी

  • २८६ प्रजातींचे ३५०० दुर्मिळ वृक्ष

  1. शनिवार व रविवारी पर्यटक मोठ्या संख्येने हजेरी लावतात.

  2. विविध २८६ प्रजातींचे दुर्मिळ वृक्ष पाहण्यासाठी वृक्षप्रेमींचा राबता

  3. सध्या उद्यानात शिवा नावाचे अस्वल दाखल झाले आहे.

  4. अर्जुन नावाचा बिबट्या आणि त्याच्या मादीची पर्यटकांना भुरळ पडत आहे. या प्राण्यांची छबी टिपण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू असते.

बदललेले रूप आणि नवीन प्राण्यांच्या दर्शनासाठी उद्यानात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. सोमवार ते शुक्रवार सुमारे चार हजार पर्यटक राणीबाग पाहण्यासाठी येत होते. आता ही संख्या १३ हजारांच्या वर गेली आहे; तर शनिवारी आणि रविवारी २५ हजारांहून अधिक पर्यटक उद्यानाला भेट देतात.

- डॉ. संजय त्रिपाठी, उद्यान संचालक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.