अत्यंत दुर्दैवी घटना आणि संतापजनक सारे -आशिष शेलार

अत्यंत दुर्दैवी घटना आणि संतापजनक सारे -आशिष शेलार मुंबईच्या रुग्णालयात उंदराने कुरतडला ICUतील रूग्णाचा डोळा Rat attacks patients eye who is in ICU on ventilator in Ghatkopar Hospital BJP Ashish Shelar slams Mahavikas Aghadi Govt
ICU-Treatment
ICU-Treatment
Updated on

मुंबईच्या रुग्णालयात उंदराने कुरतडला ICUतील रूग्णाचा डोळा

मुंबई: घाटकोपर येथील महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात (ICU) व्हेंटिलेटरवर (Ventilator) असलेल्या एका रुग्णाचा (Patient) डोळा उंदराने (Rat) कुरतडल्याचा धक्कादायक (Shocking) प्रकार समोर आला. पालिका प्रशासनाने याची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी दिली. मंगळवारी मध्यरात्री 3 वाजता च्या दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणाबाबत या रुग्णाच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. या मुद्द्यावरून भाजपचे आमदार आशिष शेलार यांनीही सरकारवर टीका केली. (Rat attacks patients eye who is in ICU on ventilator in Ghatkopar Hospital BJP Ashish Shelar slams Mahavikas Aghadi Govt)

ICU-Treatment
राऊत अडचणीत?, महिलेच्या अटकेप्रकरणी HC चे पोलीस आयुक्तांना निर्देश

"सायन रुग्णालयात मृतदेहा शेजारी मुंबईकरांना उपचार घ्यावे लागतात आणि राजावाडीत आयसीयूमध्ये रुग्णांचे डोळे उंदीर कुरतडतात मग 80 हजार कोटींच्या ठेवी असलेल्या मुंबई महापालिकेचे 1 हजार 206 कोटींचे आरोग्याचे बजेट कोण खाते?कोण तिजोरी कुरतडतेय? अत्यंत दुर्दैवी घटना आणि संतापजनक सारे!"; अशा शब्दात शेलार यांनी आपली तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केला.

नक्की काय घडलं?

कुर्ला कमानी येथे राहणार्या श्रीनिवास यल्लपा या 24 वर्षीय रुग्णाला श्वसनाचा त्रास होत असल्याने दोन दिवसांपूर्वी राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याला मेंदूज्वर, आणि लिव्हरचा त्रास असल्याचे समोर आले आहे. या रुग्णाला पालिकेच्या राजावाडी रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल केले आहे. आज सकाळी त्याच्या नातेवाईकांना रुग्णाच्या डोळ्यातून रक्त येत असल्याचे दिसल्यानंतर त्यांनी धावपळ करून हा प्रकार प्रशासनाच्या लक्षात आणून दिला. डोळ्यांची तपासणी केली असता उंदराने डोळा कुरतडल्याचे समोर आले.

ICU-Treatment
धक्कादायक! राजावाडी रुग्णालयात उंदराने कुरतडला रुग्णाचा डोळा

अतिदक्षता विभाग हा तळ मजल्यावर असल्याने इथे उंदरांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. प्रथम दर्शनी ते उंदराने चावा घेतला असल्याचेच दिसत असून या बाबत सुरक्षेचे उपाय करत असल्याची माहिती राजावाडी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. विद्या ठाकूर यांनी दिली. चार वर्षापूर्वी कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात असाच प्रकार घडला होता. या प्रकारानंतर रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा उघड झाला होता. आता पुन्हा राजावाडी रुग्णालयातील असाच प्रकार घडल्याने रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा समोर आला आहे. डॉक्टरांनी तपासणी केली असता डोळ्यांना कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही. मात्र त्या रुग्णाच्या डोळ्याच्या पापण्याखाली उंदराने कुरतडल्याचे निदर्शनास आले. मात्र हा प्रकार गंभीर आहे.

ICU-Treatment
"कॅन्सरग्रस्तांच्या प्रश्नावर राजकारण व्हायला नको होते"
आशिष शेलार
आशिष शेलार

अतिदक्षता विभागातील तळमजल्यावर असला तरी हा विभाग सर्व बाजूने बंद आहे. पावसाळा असल्याने दरवाजामधून तो उंदीर आत गेला असावा. अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून उपाययोजना करण्यात येत आहेत. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

-किशोरी पेडणेकर, महापौर

..........

दोन दिवसांपूर्वी रुग्णाला रुग्णालयात दाखल केले गेले होते. झोपेतच डोळ्याला उंदराने चावा घेतला. डाव्या डोळ्याच्या खालच्या पापणीला उंदीर चावला आहे. रात्री 3 च्या दरम्यान ही घटना घडली आहे. याविषयी रुग्णालय प्रशासनाची बोलणे सुरू आहे.

-यशोदा यल्लप्पा, रुग्णाची बहिण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.