Ratan Tata : रतन टाटांना सायंकाळी ४.३० वाजता दिला जाणार अखेरचा निरोप; 'येथे' घेता येईल पार्थिवाचे अंत्यदर्शन

ratan taata to get state funeral : उद्योगपती व टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले आहे.
Ratan Tata
Ratan Tata
Updated on

उद्योगपती व टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. तब्येत खालावल्यानंतर बुधवारी रतन टाटा यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपाचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे पार्थिव सध्या त्यांच्या हलेकाय या राहत्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे. आज सकाळी १० वाजता हलेकाय येथून टाटा यांचे पार्थिव नरीमन पॉईंट येथील एनसीपीए याठिकाणी हलवण्यात येईल. त्यानंतर सकाळी १० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत सर्वसामान्य लोकांना एनसीपीए याठिकाणी टाटा यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येईल. यावेळी एनसीपीएच्या प्रवेशद्वार क्रमांक ३ मधून लोकांना अंत्यदर्शनासाठी प्रवेश दिला जाईल, तर प्रवेशद्वार क्रमांक २ मधून नागरिकांना दर्शन घेऊन बाहेर पडता येईल.

तर दुपारी ३.३० वाजता टाटा यांचे पार्थिव अंत्यसंस्कार करण्यासाठी वरळीच्या दिशेने रवाना होईल. सायंकाळी ४ वाजता मरीन ड्राईव्ह मार्गे पेडर रोड करत ही अंत्ययात्रा वरळी येथील स्मशानभूमीत पोहचेल. सायंकाळी ४.३० वाजता टाटांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात पारसी पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातील.

Ratan Tata
Ratan Tata Biography: टाटांच्या दुकानात काम करून केली सुरवात अन्.. कोण होते रतन टाटा ?

दरम्यान रतन टाटा यांच्या निधनानंतर देशभरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. सर्वच क्षेत्रातील दिग्गजांनी रतन टाटांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. यासोबतच महाराष्ट्र सरकारने आज (गुरुवार, १० ऑक्टोबर) राज्यात एक दिवसाचा शासकीय दुखवटा देखील जाहीर केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

या काळात राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येणार आहे. तसेच, मनोरंजनाचे आणि करमणुकीचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. यासोबतच मुंबईत आज राज्य शासनाचे अनेक कार्यक्रम नियोजित होते, ते सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. हे कार्यक्रम आता पुढील दिवशी घेण्यात येतील, अशी माहिती राज्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे.

Ratan Tata
Ratan Tata Passed Away: रतन टाटा हे एक जिवंत आख्यायिका होते.. CM शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची टाटांना आदरांजली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.