Thane Crime News: मुंबईत नववर्षानिमित्त रेव्ह पार्टीचे आयोजन, पोलिसांनी 100 जणांना घेतलं ताब्यात

Thane Crime News: मुंबईला लागून असलेल्या ठाण्यातील घोडबंदर रोडवर एका रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. रेव्ह पार्टीमध्ये तरुणांव्यतिरिक्त 12 मुलींनाही ताब्यात घेण्यात आले आहे. पकडण्यात आलेले बहुतांश तरुण अंमली पदार्थांचे सेवन करत होते. खासगी प्लॉटमध्ये ही पार्टी सुरू असून या पार्टीत एलएसडी, चरस, गांजा यासह चिल्लम, दारू असे अनेक नशा उपलब्ध करून देण्यात आले होते.
Thane Crime News
Thane Crime NewsEsakal
Updated on

मुंबईला लागून असलेल्या ठाण्यातील घोडबंदर रोडवर एका रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. नववर्षाच्या सेलिब्रेशनपूर्वी मुंबईला लागून असलेल्या ठाण्यात एका रेव्ह पार्टीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने या पार्टीवर कारवाई करत 100 हून अधिक तरुणांना ताब्यात घेतले आहे.

100 हून अधिक तरुणांना ताब्यात घेतल्यानंतर पोलीस त्यांची वैद्यकीय तपासणी करत आहेत. या लोकांवर या रेव्ह पार्टीत ड्रग्ज सेवन केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास हा छापा टाकला ज्यामध्ये एलएसडी, चरस, गांजा असे ड्रग्जही जप्त करण्यात आले आहे.

मुंबईला लागून असलेल्या ठाण्यातील घोडबंदर रोडवर ही रेव्ह पार्टी आयोजित करण्यात आली होती. रेव्ह पार्टीमध्ये तरुणांव्यतिरिक्त 12 मुलींनाही ताब्यात घेण्यात आले आहे. पकडण्यात आलेले बहुतांश तरुण अंमली पदार्थांचे सेवन करत होते.

Thane Crime News
Nagpur Crime: नळ फिटींगचे साहित्य चोरणाऱ्यास अटक! या गोष्टीमुळे उघडकीस आला प्रकार

खासगी प्लॉटमध्ये ही पार्टी सुरू असून या पार्टीत एलएसडी, चरस, गांजा यासह चिल्लम, दारू असे अनेक नशा उपलब्ध करून देण्यात आले होते. या रेव्ह पार्टीचा सूत्रधार कळवा डोंबिवली परिसरातील रहिवासी आहे.

रेव्ह पार्टीत सहभागी झालेल्या लोकांच्या 19 दुचाकीही पोलिसांनी जप्त केल्या आहेत. अटक केलेल्या सर्वांना वैद्यकीय तपासणीसाठी ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे.

Thane Crime News
Navi Mumbai: अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी घेतला 'हा' महत्वाचा निर्णय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.