मुंबई महापालिकेच्या विरोधी नेतेपदी रवीराजा कायम, भाजपची याचिका नामंजूर

मुंबई महापालिकेच्या विरोधी नेतेपदी रवीराजा कायम, भाजपची याचिका नामंजूर
Updated on

मुंबई: मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसचे रवीराजा यांची नियुक्ती मुंबई उच्च न्यायालयाने आज कायम केली. रवीराजा यांच्या नियुक्तीला विरोध करणारी भाजपचे नगरसेवक प्रभाकर शिंदे यांची याचिका न्यायालयाने फेटाळली. मुंबई महापालिकेत गेल्या 25 वर्षाहून अधिक काळापासून शिवसेनेची सत्ता आहे. या सत्ता काळात मित्रपक्ष असलेल्या भाजपने राज्यात सत्ता समीकरणे बदलल्यावर महापालिकेत विरोधाची भूमिका घेतली. विरोधी पक्षनेते पदावर दावा करत भाजपने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

महापालिकेच्या विरोधी पक्षनेता म्हणून शिंदे यांची नियुक्ती करण्याची मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली होती. मात्र महापौर किशोरी पेडणेकर यांनी ही मागणी अमान्य केली होती. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. भाजपचे महापालिकेतील सत्ता बळ दुसऱ्या क्रमांकावर आहे.

शिवसेना 95, भाजप 83, काँग्रेस 30 तर राष्ट्रवादी काँग्रेस 9 असे संख्या बळ आहे. त्यामुळे महापालिकेतील विरोधी नेता म्हणून निवड करण्याची मागणी केली होती. या मागणीला शिवसेनेसह सर्व पक्षकारांनी विरोध केला. रवीराजा यांची नियुक्ती नियमानुसार झाली असून कोणतेही उल्लंघन करण्यात आलेले नाही, असा युक्तिवाद करण्यात आला.

रवीराजा यांच्या वतीने अॅड जोईल कार्लोस यांनी बाजू मांडली. न्या शाहरूख काथावाला यांच्या खंडपीठाने नगरसेवक शिंदे यांची याचिका आज नामंजूर केली.

-------------------

(संपादनः पूजा विचारे) 

Ravi Raja retains Mumbai Municipal Corporation as Leader of Opposition

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.