मुंबईः नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर यांच्या मेव्हण्याने मतमोजणी केंद्रात मोबाईल फोन वापरल्याप्रकरणी आणखी एक अपडेट पुढे येत आहे. ज्या मोबाईल फोनवरुन ईव्हीएम मशिन अनलॉक केलं, तोच मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याला वापरण्यासाठी दिल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
पोल पोर्टल ऑपरेटर दिनेश गुरव यांनी वायकरांचे मेहुणे मंगेश पंडीलकर यांना मतमोजणी केंद्रात आपला फोन वापरायला दिल्याचा आरोप होत आहे. तोच फोन EVM मशीनशी जोडलेला होता, त्याच मोबाईल फोनने EVM मशीन अनलॉक करण्यात आलेली होती आणि त्याच मोबाईलवर आलेल्या OTP आलेला होता.
मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल फोनच्या वापराला मनाई असतानादेखील फोन वापरण्यात आला. आता पोलिसांनी तो मोबाईल फोन जप्त करून FSL ला पाठवला आहे. मोबाईलवरील बोटांचे ठसे घेतले जाणार असून पंडीलकर यांनी कोणाशी बोलणं केलं याचा देखील तपास पोलिस करणार आहेत. दोघांनाही ४१(अ) ची नोटीस बजावत हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलेलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.