मुंबई: देशाच्या पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यावर दडपशाही करीत त्यांचे योग्य मागण्या करणारे आंदोलन विविध मार्गांनी दडपू पाहणारे भाजप प्रणित केंद्र सरकार समस्त सामान्य भारतीयाला विविध प्रकारे त्रास देत आहे. गेल्या कित्येक वर्षांत इंधन दर वाढ विरोधात अग्रेसर असणारे तमाम भाजप आणि त्यांचे समर्थक पक्ष मात्र सध्याच्या त्यांच्याच केंद्र सरकारच्या इंधन दर वाढ प्रकरणी केवळ गप्पच बसले नसून त्या दर वाढीचे समर्थनही करीत आहेत. शेतकरी वर्ग आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नावर मुग गिळून बसलेल्या या केंद्र सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले असून त्यांच्या पापाचे घडे भरले आहेत. त्यांना सत्तेवरून खाली खेचा, असे आवाहन शिवसेना नेते यांनी गोरेगाव येथे केले.
गोरेगाव रेल्वे स्थानक पूर्वेला सकाळीच 11 वाजता मंत्री आणि जोगेश्वरीचे आमदार रवींद्र वायकर, दिंडोशीचे आमदार सुनील प्रभू, मुंबई पालिका उपमहापौर सुहास वाडकर, नगरसेवक तुळशीराम शिंदे, पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी दिलीप शिंदे , नगरसेविका साधना माने, दीपक सुर्वे, भाजपा मधून नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेले समीर देसाई यांच्या सह शेकडो पुरुष आणि महिला कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारचे विरोधात घोषणा देत स्टेशन परिसर दणाणून सोडला.
रवींद्र वायकर यांनी आपली भूमिका मांडताना सोप्या भाषेत कच्चे तेलाची दर बाबत माहिती दिली. महाराष्ट्रातील सध्याचे पेट्रोल आणि डिझेलचे भाव आणि अन्य राज्यातील इंधनाचे दर याबाबत माहिती दिली. इंधन दर वाढ केंद्र सरकारचे अख्यारीत असताना महाराष्ट्रातील भाजपाचे नेते सामान्य नागरिकांची दिशाभूल करणारे वक्तव्ये करीत त्यांच्याच सरकारची चूक लपवीत आहेत.
देशातील जनतेच्या पोशिंदा असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या मार्गात खिळे टाकून त्यांच्यावर दडपशाही करीत आहे. इंधन दर वाढ प्रश्नी पोपटपंची करणाऱ्या भाजपा नेत्यांनी याबाबत प्रथम माहिती घ्यावी आणि मग बोलावे. आपली स्मरणशक्ती ही चांगली करावी कारण या अगोदर अनेक वर्षे ते इंधन दरवाढ विरोधात जे जे काही बोलले आणि केले त्याचे आता त्यांनी विस्मरण करू नये, असा टोलाही वायकर यांनी लगावला.
आमदार सुनील प्रभू यांनी ही विविध आघाड्यांवर केंद्र सरकारने केलेल्या चुकीच्या निर्णयाची माहिती दिली. इंधन दर वाढ आणि शेतकरी प्रश्न हे त्याचेच द्योतक असल्याचे प्रभू यांनी सांगून भाजप नेत्यांची बोलती बंद करणारी भूमिका मांडली.
शेतकरी प्रश्नावर भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर भाजपमुळे नाचक्की झाली असून शेतकऱ्यांवर केंद्र सरकार करीत असलेल्या जगभरातील प्रतिक्रियाही प्रभू यांनी उपस्थितासमोर मांडल्या. वायकर आणि प्रभू यांनी उपस्थित सर्वांना इंधन दर वाढ कशी केंद्राचे अख्यातीत आहे. हे सर्वसामान्यांना समजले पाहिजे, यासाठी सोशल मीडियाचा वापर करा, इंधन दर वाढ अन्यायकारक असून केंद्र सरकार आणि भाजपचे धोरणच त्यासाठी कारणीभूत असल्याचे सर्वांना पटवून द्यावे, असे सांगितले.
--------------------------------
(संपादन- पूजा विचारे)
Ravindra waikar sunil prabhu shivsena protest fule price hike goregaon
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.