ऐतिहासिक चवदार तळ्याच्या विकासासाठी प्रस्ताव; सुमारे 15 कोटी रुपयांची आवश्‍यकता

ऐतिहासिक चवदार तळ्याच्या विकासासाठी प्रस्ताव; सुमारे 15 कोटी रुपयांची आवश्‍यकता
Updated on

महाड : जगाला समतेचा संदेश देणाऱ्या चवदार तळ्याच्या सुशोभिकरणासाठी सरकारकडून निधी मिळण्याची प्रतीक्षा आहे. 2011 मध्ये तळ्याच्या विकासाचा आराखडा राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता. परंतु लालफितीत अडकला. या पार्श्‍वभूमीवर महाड पालिकेने आता पुन्हा नवीन आराखडा पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या कामासाठी सुमारे 15 कोटींची आवश्‍यकता आहे. 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी केलेल्या सत्याग्रहामुळे महाड येथील चवदार तळे जगाच्या नकाशावर आले. या तळ्याला दरवर्षी लाखो अनुयायी आणि पर्यटक भेट देतात. तळे सत्याग्रहावरती शोध निबंध लिहिण्यासाठी अनेक अभ्यासक या ठिकाणी येतात. सत्याग्रहाचा वर्धापनदिनही 20 मार्चला मोठ्या प्रमाणात साजरा होता. परंतु अनेक वर्षात चवदार तळे विकासाला निधीच न मिळाल्याने तळ्याचे सुशोभिकरण रखडले आहे. 

तळ्यांच्या भिंतींची आणि पाय-यांची दुरुस्ती, कठडे दुरुस्ती, रंगरेगोटी करावी लागणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तळे नगरपालिकेच्या अखत्यारीत आहे. त्याच्या देखभाल आणि दुरुस्तीचा अनेक कामे पालिकेने केलेली आहेत. परंतु मोठ्या प्रमाणात सुशोभीकरणाचे कामे करण्यासाठी सरकारी निधीची गरज आहे. 1989 मध्ये ऍड. सुधाकर सावंत हे नगराध्यक्ष असताना तळ्याचे सुशोभीकरण करण्यात आले होते. त्यानंतर मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली आहे. सध्या पालिकेने सभागृह रंगरंगोटीचे काम आपल्या खर्चातून पूर्ण केलेले आहे. शुध्द पाणी पुरवणे तसेच चवदार तळ्याची विद्युत रोषणाई, कारंजासह परिसरातील रस्ते, पदपथ, रमाबाई सभागृह दुरुस्ती अशी अनेक कामे चवदार तळे विकास आराखड्यात पालिकेने घेतलेली आहेत. अशा विविध कामांचा समावेश करण्यात आलेली नवीन कामांचे सुमारे 21 कोटी रुपयांचा प्रस्ताव 2011 मध्ये सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. या कामासाठी तांत्रिक सल्लागार म्हणून पल्लवी लाटकर यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. त्यांनी तात्कालीन मुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्या पुढे चवदारतळे विकास आराखड्याचे सादरीकरणही केले होते. परंतु त्यानंतर या प्रस्तावाला कोणत्याही प्रकारची मंजुरी आणि निधी मिळाला नाही.  दरम्यान चवदारदार तळ्याचे पाणी शुद्धीकरण करण्यासाठी समाज कल्याण विभागाकडून सव्वा कोटी रुपयांचा निधी यापूर्वी उपलब्ध करून दिलेला होता. त्यानंतर जुजबी कामे नगरपालिका करण्याचा प्रयत्न करत असली तरी तो पुरेसा नाही. 

महाड पालिकेकडून आता चवदार तळ्याचा हाच प्रस्ताव पुन्हा नव्याने पाठवला जाणार आहे. तांत्रिक सल्लागार पल्लवी लाटकर यांनी चवदार तळे येथे चार दिवसांपूर्वी भेट दिली. या वेळी मुख्याधिकारी आणि अन्य सदस्य नगरसेवक हे त्यांच्यासोबत होते. चवदार तळ्याचे पाहणी नव्याने करून सुशोभिकरणाचा सुमारे 15 कोटीचा प्रस्ताव पुन्हा पाठवावा असे त्यांनी सूचित केले. 

चवदार तळे विकासासाठी सुमारे 15 कोटी रुपयांचा प्रस्ताव सरकारकडे सादर करण्यात येत आहे. याबाबत तांत्रिक सल्लागार यांनी येथील पाहणीही केली आहे. पालिकेने यापुर्वाही प्रस्ताव पाठवलेला होता. 
- जीवन पाटील,
मुख्याधिकारी, महाड 

दृष्टिक्षेप 

  • चवदार तळे सत्याग्रह : 20 मार्च 1927 
  • पहिले सुशोभीकरण : 1989 
  • दुरूस्ती सुशोभीकरणासाठी 2011 मध्ये पाठवलेला प्रस्ताव : 21 कोटी 
  • सध्याचा सुशोभीकरणाचा प्रस्ताव : 15 कोटी 

--------------------------------------------- 

( संपादन - तुषार सोनवणे )

Re proposals for the development of the Chavdar lake About Rs 15 crore is required

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.