Mumbai Airport : मुंबई विमानतळावर रेकॉर्डब्रेक गर्दी; दोन दिवसांत दीड लाख प्रवाशी गेले परदेशी

देशभरातील बहुतेक मोठ्या विमानतळंही गर्दीनं फुलली
Mumbai Airport
Mumbai Airport
Updated on

मुंबई विमानतळावर आजही रेकॉर्डब्रेक गर्दी पहायला मिळाली. गेल्या दोन दिवसांत दीड लाख प्रवाशी परदेशात गेले आहेत. केवळ मुंबईतच नव्हे तर देशभरातील बहुतेक बड्या विमानतळांवर गर्दीची दृश्ये दिसत आहेत. (Record breaking rush at Mumbai International Airport One and half lakh passengers went abroad in two days)

Mumbai Airport
Pune Rickshaw Driver Protest : आंदोलकांचा उद्रेक! रिक्षा सोडून चालक निघाले घरी

छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानवाहतूक एरव्ही सुरळीत पार पडत असते पण यंदा हे चित्र काहीसं गर्दीचं झालं आहे. याची कारणं म्हणजे ख्रिसमस आणि इयर एन्डनिमित्त सध्या सुट्ट्यांचा हंगाम आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या काळात लोकांना देशाबाहेर फिरस्ती करता आली नाही, म्हणून यंदा लोकांनी देशाबाहेर जाण्यास पसंती दिली आहे.

Mumbai Airport
India-China Tawang Clash: गलवानची पुनरावृत्ती! तवांगमध्ये भारत-चीनचं सैन्य एकमेकांना भिडलं; 30 जखमी

या विमानतळावरुन रोज ८२२ विमानांची उड्डाण होतात. पण गेल्या गेल्या दोन दिवसात सुमारे दीड लाख प्रवाशांनी इथून प्रवास केला आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी देशातील गर्दीच्या विमानळांचा आढावा घेत प्राधिकरणाला सूचना केल्या होत्या.

हेही वाचा - सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

दरम्यान, विमान प्राधिकरणानं सुचना केल्या होत्या की जर प्रवाशांना देशाबाहेर प्रवास करायचा असेल तर साडेतीन तास आधी विमानतळावर यावं लागेल. तसेच देशांतर्गत प्रवास करायचा असेल तर अडीच तास आधी यावं लागेल. यामागे सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर विमानतळांवर होत असलेल्या गर्दीचं कारण असल्याचं दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.