मुंबई: राज्यात कोरोनाबधितांची संख्या दररोज वाढत असली तरी मुंबईत मात्र ती स्थिर असल्याचे दिसते. मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्या साधारणता 7 ते 8 हजाराच्या दरम्यान असून ती स्थिर आहे. यावरूनच मुंबईत कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मुंबईत कोरोनाच्या पहिल्या लाटेप्रमाणेच दुसऱ्या लाटेनंही थैमान घातलं. दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत गेली. पण आता दिवसेंदिवस रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे.
मुंबईने ज्या प्रकारे पहिल्या लाटेला थोपवलं तसंच आता दुसऱ्या लाटेलाही मुंबई थोपवणारच अशी आशा निर्माण झाली आहे. मुंबईतील कोरोनाची आकडेवारी चांगले संकेत देत आहे. या महिन्याच्या अखेर पर्यंत मुंबईत कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं हे चित्र आहे. मे महिन्याच्या अखेर पर्यंत कोरोना नियंत्रणात येईल असे राज्य कृती दलाचे सदस्य डॉ अविनाश सुपे यांनी सांगितले.
मुंबईतील दैनंदिन नव्या कोरोना रुग्णांची संख्या 11 हजारच्या पार गेली होती. त्यामुळे चिंता वाढली होती. पण आता ही संख्या 7-8 हजारच्या खाली आहे. दररोज नवे कोरोना रुग्ण कमी जास्त होत आहेत. पण गेले आठवडाभर ही संख्या 7 ते 8 हजाराच्या दरम्यानच आहे. ही संख्या देखील तुलनेने अधिक असली तरी ती स्थिर असल्याचे दिसते. मुंबईसाठी हे खूप दिलासादायक असं चित्र आहे.
मुंबईतील गेल्या 12 दिवसांतील नव्या कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहिल्यास
दिनांक - नवे बाधित रुग्ण
21 एप्रिल - 7684
20 एप्रिल - 7214
19 एप्रिल - 7381
18 एप्रिल - 8479
17 एप्रिल - 8834
16 एप्रिल - 8839
15 एप्रिल--8217
14 एप्रिल - 9925
13 एप्रिल - 7898
12 एप्रिल - 6905
11 एप्रिल - 9989
10एप्रिल - 9327
21 एप्रिलच्या आकडेवारीनुसार, मुंबईत एकूण 6,01,590 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 5,03,053 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्या 84743 इतके ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर हा 84 % टक्के आहे. तर रुग्ण दुपटीचा कालावधी आता 48 दिवस आहे.
मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा स्थिरावल्याचं दिसतं आहे. जर ही स्थिती अशीच राहिली तर मुंबईतील कोरोनाची दुसरी लाट कमी होण्याची शक्यता आहे. पण पुढील आठवड्यातच हे आपण ठोसपणे सांगू शकतो, असं मुंबईचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.