समुद्रातील लाल 'शेवाळ'पासून तयार होणार कोरोनाचं औषध? या भारतीय कंपनीकडून शोध सुरु

समुद्रातील लाल 'शेवाळ'पासून तयार होणार कोरोनाचं औषध? या भारतीय कंपनीकडून शोध सुरु
Updated on

मुंबई : जगभरात कोरोना व्हायरस हाहाकार माजवतोय. भारतातही कोरोनाचे तब्बल १० हजारच्यावर रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत ३५० लक्ष जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत चालला आहे. मात्र आता यावर औषध असल्याचा दावा रिलायन्स कंपनीकडून करण्यात आला आहे. यावर संशोधन करण्यात येतंय.

संपूर्ण जगात कोरोनावर औषध तयार करण्यासाठी वैज्ञानिक सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. मात्र कोरोनावर कुठलंही औषध अजूनपर्यंत तयार करण्यात वैज्ञानिकांना यश आलं नाहीये. त्यामुळे मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मात्र अशातच रिलायन्स कंपनीकडून एक शोध लावण्यात आला आहे. ज्याप्रमाणे समुद्रात असलेल्या लाल काईपासून कोरोनावर औषध तयार करणं शक्य आहे.

समुद्रात असणाऱ्या लाल मॉस म्हणजे शेवाळ्यातून एक जैविक रसायन बाहेर निघतं, ज्यापासून कोटिंग पाउडर तयार करून त्याचा उपयोग सॅनिटरी वस्तूंवर होऊ शकतो. म्हणजेच सिंक, टॉयलेट, पाण्याची टाकीमध्ये याचा वापर केला तर कोरोनाचा संसर्ग रोखला जाऊ शकतो असा दावा  रिलायन्स कंपनीच्या वैज्ञानिकांकडून करण्यात आला आहे.

मात्र रिलायन्स कंपनीकडून करण्यात आलेला या दाव्यावर कंपनीच्या वैज्ञानिकांकडून संशोधन सुरु आहे. रिलायन्स कंपनीच्या रिसर्च आणि डेव्हल्पमेंट क्षेत्रात काम करणारे विनोद नागर,महादेव गायकवाड,योगेश पवार आणि शंतनू दास गुप्ता हे ४ वैज्ञानिक सध्या यावर संशोधन करत आहेत.

"रिलायन्स लाईफ सायन्स भारतावर आणि जगावर आलेल्या या महामारीवर संशोधन करेल आणि यावर उपचार शोधण्याचा प्रयत्न करेल" असं काही दिवसांआधी रिलायन्स ग्रुपचे  मालक मुकेश अंबानी यांनी म्हंटल होतं.
 
रिलायन्स ग्रुपकडून आता यावर संशोधन केलं जात आहे. जर यात त्यांना यश प्राप्त झालं तर कोरोनापासून संपूर्ण जगाचा बचाव होईल हे नक्की.

reliance life sciences is experimenting on red moss found in ocean for corona antidote

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.