Hasan Mushrif : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफांना मोठा दिलासा; 27 एप्रिलपर्यंत अटकेपासून मिळालं संरक्षण

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफांबाबत (Hasan Mushrif) मोठी बातमी समोर येत आहे.
NCP leader Hasan Mushrif
NCP leader Hasan Mushrifesakal
Updated on
Summary

मुश्रीफांवर सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात (Sarsenapati Santaji Ghorpade Sugar Factory) मनी लॉन्ड्रिंगचा घोटाळा (Money Laundering Case) झाल्याचा आरोप आहे.

Hasan Mushrif News : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफांबाबत (Hasan Mushrif) मोठी बातमी समोर येत आहे. मुंबई उच्च न्यायालयानं (Bombay High Court) मनी लाँड्रिंग प्रकरणात हसन मुश्रीफ यांना अटकेपासूनचे अंतरिम संरक्षण कायम ठेवलं आहे.

त्यांना 27 एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळाल्यामुळं मोठा दिलासा मिळालाय. ईडीनं उत्तर देण्यासाठी वेळ मागितल्यानंतर न्यायालयानं मुश्रीफांना अटकेपासून दिलेलं संरक्षण कायम ठेवलं आहे.

NCP leader Hasan Mushrif
Karnataka Election : भाजपला धक्क्यावर धक्के; तिकीट नाकारल्यामुळं नाराज मंत्र्यानं घेतला मोठा निर्णय

मुश्रीफांवर सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात (Sarsenapati Santaji Ghorpade Sugar Factory) मनी लॉन्ड्रिंगचा घोटाळा (Money Laundering Case) झाल्याचा आरोप आहे. हसन मुश्रीफ यांनी 2011 साली मंत्री असताना आपल्या पदाचा गैरवापर करुन स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पैसे जमा केले होते. जवळपास 38 कोटींपेक्षा जास्त रक्कम ती होती. या पैशांमध्ये साखर कारखाना सुरु करुन त्यांना शेअर्समध्ये सामावून घेण्याचं आमिष दाखवण्यात आलं होतं. पण, ते पैसे मुश्रीफांनी स्वत:च्या फायद्यासाठी वापरले, असा आरोप करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.