मुंबईत आता 'या' रुग्णालयांमध्ये रेमडेसेवीरचा पुरवठा बंद

मुंबईत आता 'या' रुग्णालयांमध्ये रेमडेसेवीरचा पुरवठा बंद
Updated on

मुंबई: कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या रेमडेसेवीर इंजेक्शनबाबत अन्न आणि औषध प्रशासनाने कडक निर्णय घेतला आहे. रेमडेसेवीर इंजेक्शन कोविड नसलेल्या रुग्णालयांना पुरवले जाणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेमडेसेवीर इंजेक्शनचा होणारा काळाबाजार रोखण्यासाठी आणि पुरवठा सुरळीत करण्यासाठी एफडीएने ही कठोर पावले उचलली आहेत. त्याअंतर्गत वितरकांना आता नॉन कोविड रुग्णालयांना रेमडेसेवीर इंजेक्शन न पुरवण्याचे आदेश दिले आहेत. एफडीएनेही याबाबत परिपत्रक जारी केले आहे.

मुंबईसह राज्यात कोरोना उपचारांसाठी लागणारे रेमडेसेवीर इंजेक्शनची कमतरता आहे. काही वितरक याचा गैरफायदा घेत आहेत आणि इंजेक्शनचा काळा बाजार करत आहेत. या सर्व प्रकाराला एफडीएने गांभीर्याने घेतले आहे. काळ्या बाजाराला आळा घालण्यासाठी एफडीएने कठोर पावले उचलली आहेत. एफडीएचे सहआयुक्त जी. बी. बायळे यांनी शनिवारी एक परिपत्रकही जारी केले आहे. या परिपत्रकाअंतर्गत कोविड समर्पित असलेले रुग्णालय आणि वैद्यकीय दुकान असलेल्या रुग्णालये याच रुग्णालयात वितरक रेमडेसेवीर  इंजेक्शन पुरवतील.

मुंबईतल्या लसीकरणाबाबत मोठी बातमी, पालिकेनं घेतला महत्त्वाचा निर्णय

शिवाय, ज्या कोविड रुग्णालयात वैद्यकीय दुकाने नाहीत त्या रुग्णालयांनाही वितरक आणि किरकोळ विक्रेते इंजेक्शन पुरवतील. एवढेच नव्हे तर कोविड रुग्णालयांच्या डॉक्टरांच्या सूचनानुसार एफडीएने रुग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्शन देण्याचे आदेश दिले आहेत. एफडीएने वितरकांना मुंबईत किती कोविड रुग्णालये आहेत याची यादी दिली आहे. त्यानुसारच, इंजेक्शनचा पुरवठा केला जाणार आहे. यात 115 रुग्णालयांचा समावेश आहे.

115 रुग्णालयात रेमेडिसवीरचा पुरवठा 

रेमेडिसवीरचा काळा बाजार रोखण्यासाठी आणि रुग्णांना हे औषध मिळावे यासाठी त्याची विक्री होणाऱ्या 115 रुग्णालयांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात राज्य सरकारी, पालिका प्रशासन, लष्करी आणि खासगी रुग्णालये असे मिळून 115 रुग्णालये आहेत. यात सात राज्य सरकारी रुग्णालये, 86 खासगी हॉस्पिटल, 21 पालिका रुग्णालये आणि 1 लष्करी रुग्णालय आहे.

------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Remedesavir not be supplied Non covid hospitals fda decision

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.