काय सांगता; 'रेमेडेसीवीर' औषध मिळणार मोफत! पण कुठे, वाचा बातमी सविस्तर

काय सांगता; 'रेमेडेसीवीर' औषध मिळणार मोफत! पण कुठे, वाचा बातमी सविस्तर
Updated on

मुंबई : 'रेमेडेसीवीर' इंजेक्शन सरकारी रुग्णालयात मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्यात येणार असून रुग्णांना मोफत दिलं जाणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कोरोना बाधित गंभीर रुग्णांसाठी हे इंजेक्शन उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

'रेमेडेसीवीर' हे औषध कोरोना बाधित गंभीर रुग्णांसाठी गुणकारी असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे या औषधाची मागणी वाढली आहे. हे औषध अत्यंत महागडे असून एक इंजेक्शन साधारणता 40 ते 50 हजार रुपयांना मिळते. त्यामुळे खासगी रुग्णालयांत या इंजेक्शनचा अधिकतर वापर होतो. अत्यंत महागडे असल्याने सरकारी रुग्णालयांत उपचार घेणाऱ्या गरजू आणि गरीब रुग्णांना मात्र हे महागडे औषध विकत घेणे शक्य होत नाही. 

कोरोना बाधित रुग्णांना फायदेशीर असल्याने हे औषध सरकारी रुग्णालयांत देखील उपलब्ध करण्याचा निर्णय राज्य आरोग्य विभागाने घेतला आहे. सरकारी रुग्णालायत उपचार घेणाऱ्या गंभीर रुग्णांना हे औषध मोफत देण्यात येणार आहे. आवश्यकते प्रमाणे मुबलक प्रमाणात हे औषध उपलब्ध करण्यात येणार आहे. औषध महागडे असल्याने सरकारी रुग्णालयांतील गरजू , गरीब रुग्णांना ते विकत घेता येत नव्हते , मात्र सरकारी रुग्णालयांत आता हे औषध उपलब्ध होणार असल्याने अनेक रुग्णांना त्याचा लाभ होणार असल्याचे ही टोपे यांनी सांगितले.

अमेरिकेतील गिलीयड सायन्स कंपनीचे हे औषध असून तिथे ते 'इबोला' या आजारावर वापरले जाते. हे औषध कोरोना रुग्णांसाठी देखील गुणकारी असल्याचे सिद्ध झाल्याने त्याचा वापर कोरोना बाधित रुग्णांवर करण्याचा निर्णय घेण्यात आला. ड्रग्स कंट्रोल जनरल ऑफ इंडियाने 1 जून पासून भारतातील चार कंपन्यांना या औषधांच्या निर्मितीची परवानगी दिली आहे. त्यामुळे आवश्यकतेनुसार हे औषध उपलब्ध होणार आहे. महत्वाचे म्हणजे लहान मुलं तसेच वयस्कर रुग्णांना देखील हे औषध देता येणार आहे. त्यामुळे मृत्युदर नियंत्रणात आणण्यात मदत मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.