Mumbai News : मुंबईला विद्रुप करणारे अनधिकृत बॅनर्स हटवा

आयुक्तांकडून सुशोभिकरणाच्या ५०० कामांचा आढावा
Remove unauthorized banners Mumbai Iqbal Singh Chahal cm eknath shinde mumbai
Remove unauthorized banners Mumbai Iqbal Singh Chahal cm eknath shinde mumbaisakal
Updated on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर मुंबई सौंदर्यीकरण करण्याचे काम वेगाने सुरु झाले आहे. उड्डाणपुलाखाली सुशोभिकरण, भिंतीवर चित्र रंगवणे अशा एकूण ५०० ठिकाणी सौंदर्यीकरणाचे काम सुरु आहे.

मुंबईचे सौंदर्यीकरण होत असताना मुंबई विद्रुप करणारे अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्स, होडिग्ज हटवा, असे आदेश पालिका आयुक्त व प्रशासक डॉ इकबाल सिंग चहल यांनी संबंधित विभागांना दिले आहेत.

मुंबईला विद्रुप करु नका, असे आदेश देत अनधिकृत होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स झळकवण्यास मुंबई उच्च न्यायालयाने सक्त मनाई केली आहे. तरीही राजकीय पक्षांचे बॅनर्स पोस्टर्स व होडिंग्ज ठिकाणी ठिकाणी झळकलेले दिसतात.

पालिकेने अशा बॅनर्सवर कारवाईची मोहिम हाती घेण्याच्याही सूचना आयुक्तांनी केली आहे. मुंबईतील ज्या ५०० ठिकाणी सुशोभीकरणाच्या कामांचे नियोजन करण्यात आले असून काही कामे प्रगतिपथावर आहेत अशा सर्व ठिकाणी पथदिवे व प्रकाशयोजना अधिक प्रभावी करण्याचेही निर्देश दिले आहेत.

महानगरपालिका अखत्यारितील पुलांची अधिक प्रभावी साफसफाई करण्यासह तेथे आकर्षक रंगरंगोटी करण्यासह वाहतूक बेटांचेही सुशोभीकरण केले जाणार आहे.

येत्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील विविध ठिकाणी सुशोभीकरणाची कामे वेगाने करण्याचेही निर्देश दिले आहेत.

मुंबईत अनेक ठिकाणी अनधिकृतपणे बॅनर्स, होर्डिंग्ज लावले जातात. यामुळे मुंबई विद्रुप होते. त्यामुळे सुशोभिकरण करताना पालिकेकडुन होर्डिंग्जवर कारवाई करण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षात एकूण ३५,५८८ बॅनरवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई दरम्यान ३५ एफआयआर नोंदवण्यात आले असून ८६५ जणांविरोधात न्यायालयात केसेस दाखल करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.