मुंबई - दिल्लीपेक्षा मुंबई सेफ आहे असं आपण अनेकदा म्हणतो. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत मुंबईत तुम्हाला रात्री फिरत येतं, इथे फिरताना तुम्हाला घाबरायची गरज नाही वगैरे वगैरे.. पण यासंदर्भातील एक धक्कादायक अहवाल आता समोर आलाय. मात्र एका अहवालात देशभरातील लहान मुलं आणि महिलांच्या तस्करीबद्दल माहिती देण्यात आलेली आहे.
NCRB म्हणजेच नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरोनं याबाबत माहिती दिली आहे. या अहवालात मानवी तस्करीत मुंबई सर्वात वर म्हणजे एक नंबरवर आहे. त्यामुळे खरंच मुंबई सेफ आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. या अहवालात मुंबईसोबत कोलकता आणि इंदोर या शहरांचा देसखील मानवी तस्करीत अव्वल नंबर लागतोय.
२०११ साली बेपत्ता झालेल्या महिला आणि मुलांचा डाटा गोळा केला जावा अशी शिफारस केली गेलेली. यानंतर एका समितीची स्थापना करण्यात आली. या समितीने २०१९ मध्ये आपला अहवाल सादर केलाय. याअंतर्गत मानवी तस्करीत लहान मुले आणि महिला यांच्या आकडेवारीबद्दल माहिती देण्यात आलेली आहे.
या अहवालानुसार महाराष्ट्रातील काही मोठी शहरं लहान मुलं आणि महिलांच्या तस्करीत पुढे असल्याचं देखील समोर येतंय. महाराष्ट्रातील या शहरांमध्ये मुंबई तर आहेच, यासोबत पुणे आणि ठाणे या शहरांचा देखील नंबर लागतोय.
या धक्कादायक आकडेवारीनुसार मुंबईत २०१७ साली ४७१८ तर २०१८ साली ५२०१ तर पुण्यातून २०१७ साली २५७६ आणि २०१८ साली २५०४ तस्करीची प्रकरणं समोर आलीत. लैंगिक शोषण करणे, बाल कामगार म्हणून कामाला जुंपणे, जबरदस्तीने लग्न करणे अशा कामांसाठी मुलं आणि महिलांची तस्करी केली जाते.
'युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्स अँड क्राईम म्हणजेच (UNODC) ने सादर केलेल्या एका अहवालात जबरदस्तीने मजुरीसाठी आणल्या जाणाऱ्या कामगारांमध्ये पुरुष तर लैंगिक शोषणासाठी महिलांची तस्करी केली जात असल्याचं समोर आलाय.
report of human trafficking in india mumbai tops the chart kolkata is second in the list
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.