मुंबई : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले मुंबई प्रदेश युवक अध्यक्ष व उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष रमेश गायकवाड यांनी मंगळवारी दादर रेल्वे स्टेशन येथे जाहीर आंदोलन केले. केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब यांनी बरेच वर्षापासून दादर रेल्वे स्टेशनचे चैत्यभूमी रेल्वे स्टेशन असे नामकरण होण्यासाठी वेळोवेळी प्रशासनाशी पत्रव्यवहार करून मागणी केलेली आहे.
मात्र अद्याप मागणी पूर्ण होत नसल्याने मंगळवारी पुन्हा आरपीआयचे पदाधिकारी रमेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली दादर रेल्वे स्टेशन परिसरात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात दहिसर तालुकाध्यक्ष दिलीप आवळे व शेकडो कार्यकर्ते सामील झाले होते. यादरम्यान दादर रेल्वे स्टेशनला चैत्यभूमी रेल्वे स्थानक नाव दिलेच पाहिजे या घोषणांनी दादर परिसर दणाणून सोडले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.