माथेरानला पर्यटकांची मांदियाळी, मिनी ट्रेन शटल सेवेच्या फेऱ्यांमध्ये वाढ

माथेरानला पर्यटकांची मांदियाळी, मिनी ट्रेन शटल सेवेच्या फेऱ्यांमध्ये वाढ
Updated on

मुंबईः  17 मार्च नंतर माथेरान हे पर्यटन स्थळ बंद होते आणि 3 सप्टेंबर रोजी माथेरान सुरू केल्यानंतर देखील पर्यटकांनी माथेरानकडे पाठ फिरविली होती. मात्र दिवाळी हंगामात माथेरानमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटकांची पावले माथेरानकडे वळली आहेत. पर्यटकांची मिनिट्रेनला पसंती लक्षात घेता माथेरान गिरीस्थान नगरपरिषद कडून माथेरान-अमन लॉज शटल सेवेच्या फेऱ्यात वाढ करण्याची मागणी करण्यात आली होती. दरम्यान आता या पर्यटन हंगामासाठी तब्बल 12 फेऱ्या मिनिट्रेन धावणार असून पर्यटकांसाठी आणि माथेरानच्या पर्यटन व्यवसायासाठी सुचिन्हे समजली जाते आहे. 

पर्यटक मिनिट्रेनसाठी माथेरान आणि अमन लॉज स्थानकात बसून राहिलेले बघून माथेरान पालिकेचे गटनेते प्रसाद सावंत यांनी मुंबईत जाऊन मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक यांची भेट घेऊन शटल सेवेच्या फेऱ्यात वाढ करण्याची मागणी केली होती.

आठ महिन्यांच्या लॉकडाऊन नंतर 2 सप्टेंबर रोजी माथेरान अनलॉक केल्यानंतर पर्यटक माथेरानला येऊ लागले. पण मिनिट्रेन सुरू झाल्यानंतर माथेरानमध्ये पर्यटकांनी पावले वळली असून दिवाळी हंगामात मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे. दस्तुरी पार्किंगमध्ये जिकडेतिकडे खासगी मोटार गाड्या दिसत आहेत. पर्यटकांना आकर्षित करणा-या मिनिट्रेनच्या शटल सेवा सुरू झाल्यानंतर सुरुवातीला फक्त दोन फेऱ्या सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र पर्यटकांचा इकडे ओघ वाढत गेल्यानंतर माथेरान गिरीस्थान नगरपरिषद नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी मध्य रेल्वेच्या वरिष्ठांना विनंती केल्यानुसार चार अप आणि डाऊन शटल फेऱ्या सुरू करण्यात आल्या होत्या. 

आठ फेऱ्या अमन लॉज आणि माथेरान दरम्यान सुरू होऊन देखील पर्यटक मिनिट्रेन साठी दोन्ही स्थानकात बसलेले दिसून येत आहेत. पर्यटकांचा वाढता ओघ आणि मागणी पाहता माथेरान नगरपरिषदचे गटनेते प्रसाद सावंत यांनी मुंबईत जाऊन मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यांची भेट घेतली. मध्य रेल्वेचे अधिकारी ( टी. आई.) एस.बी. सिंग आणि( टी. सी. आय.) शिरीष कांबळे यांना शटल फेऱ्यात वाढ केल्यास पर्यटक प्रवासी यांना कशाप्रकारे फायदा होईल आणि त्यातून मिनिट्रेनचे आकर्षण देखील वाढेल अशी भूमिका पटवून दिले. मुंबई विभागीय व्यवस्थापक यांना निवेदन देऊन रेल्वेच्या वरिष्ठांकडे मागणी करण्याबाबत सावंत यांनी विनंती केली होती. त्यानुसार या फेऱ्यात आणखीन वाढ करण्यात आली असून एकूण सहा अप आणि सहा डाऊन शटल सेवेचा लाभ पर्यटकांना घेता येणार आहे.मध्य रेल्वेच्या या निर्णयामुळे अमन लॉज आणि माथेरान दरम्यान मिनिट्रेनच्या शटल सेवेच्या तब्बल 12 फेऱ्या होणार आहेत.

वेळापत्रक

माथेरान ते अमन लॉज रेल्वे स्टेशन
सकाळी -- सकाळी 09.30, 10.20, 11.30, दुपारी-02.00, 03.10, 04.00

अमन लॉज ते माथेरान स्टेशन
सकाळी-09.55, 10.45, दुपारी 12.00, 02.30, 03.35, 04.45

-------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Request municipality in Matheran  Railways increased frequency of mini train shuttle service

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.