मुंबई : दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक छळाचे आरोप करताना अभिनेत्री रिचा चढ्ढाचा उल्लेख केल्याबद्दल वादात सापडलेल्या अभिनेत्री पायल घोष आणि रिचाला वाद मिटवण्यासाठी बुधवारपर्यंतचा (ता. 14) अवधी आज मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केला.
या प्रकरणी पायल बिनशर्त माफीनामा दाखल करण्यास तयार आहे, असे पायलच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात सांगितले आहे. मात्र तिने समाज माध्यमांवर याउलट विधान केले असल्याचे रिचाच्या वकिलांनी आज न्यायालयात सांगितले. याबाबत न्या. ए. के. मेनन यांनी पायलचे वकील नितीन सातपुते यांना विचारणा केली. ती दिलगिरी व्यक्त करणार आहे; मात्र त्यापूर्वी याबाबत रिचाच्या वकिलांशी चर्चा करू, असे त्यांनी सांगितले. न्यायालयाने दोघांनाही त्यांच्यामधील वाद तडजोड करून सोडवण्याचे निर्देश दिले. तुम्ही इतरांशी बोलण्याऐवजी एकमेकांशी बोला, असे न्या. मेनन म्हणाले.
त्यानुसार, बुधवारी यावर अंतिम तोडगा काढण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. त्यापुढे अधिक अवधी दिला जाणार नाही, असाही इशारा न्यायालयाने दिला.
कमाल खानविरोधातही दावा
रिचा चढ्ढाने पायल घोष विरोधात न्यायालयात 1.1 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. रिचाने पायलसह दिग्दर्शक कमाल खान विरोधातही दावा दाखल केला आहे. सन 2013 मध्ये अनुराग कश्यपने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पायल घोषने सोशल मीडियावर केला आहे. हा तपशील खाननेही रिपोस्ट केला होता, तर एका यू-ट्युब चॅनेलने प्रसारित केला होता. यामध्ये रिचाचा उल्लेख आक्षेपार्ह पद्धतीने घेण्यात आला आहे
-------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.