अण्णासाहेब पाटील महामंडळाची जबाबदारी अजित पवार यांच्या नियोजन खात्याकडे वर्ग

अण्णासाहेब पाटील महामंडळाची जबाबदारी अजित पवार यांच्या नियोजन खात्याकडे वर्ग
Updated on

मुंबई, ता.12: बहुचर्चित अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे कामकाज राज्य सरकारने गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नियोजन खात्याकडे वर्ग केले आहे. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाकडे असलेले हे महामंडळ नियोजन खात्याकडे वर्ग करण्याचा निर्णय  सारथी संस्थेच्या आढावा बैठकीत जुलै महिन्यात घेण्यात आला होता. त्याबाबतचा शासन निर्णय आज काढण्यात आला.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या आर्थिक आणि प्रशासकीय बाबींवर नियत्रंण ठेवण्याची जबाबदारी आता नियोजन विभागाकडे राहील. सोबतच महामंडळाशी संबंधित अर्थसंकल्पीय तरतूदी सुद्धा नियोजन विभागाकडे वितरित करण्यात येतील, असे शासन निर्णयात म्हटले आहे.

मराठा समाजाच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या या महामंडळाचे भागभांडवल 50 कोटींवरून 400 कोटी रुपये पर्यंत वाढवले आहे. मात्र, राज्य सरकारने भागभांडवल उपलब्ध करून न दिल्याने व सारथी संस्थेच्या बाबतीतही सरकार निर्णय घेत नसल्याने जून- जुलै महिन्यात मराठा समाजातील संघटना आक्रमक झाल्या होत्या. 

सारथी संस्था विजय वडेट्टीवार यांच्या बहुजन विकास कल्याण विभागातंर्गत कार्यरत होती. मात्र, मंत्री वडेट्टीवार हे ओबीसी असल्याने सारथीला न्याय देत नसल्याचा आरोप मराठा संघटनांनी केला होता. जुलै महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सारथी संस्थेच्या आढावा बैठक झाली होती. सारथी संस्था आणि कौशल्य विकास विभागातंर्गत मोडत असलेले अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ या दोन्ही संस्था  नियोजन विभागाकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला होता. 

त्याचा शासन निर्णय गुरुवारी काढण्यात आला. 4 नोव्हेंबर रोजी एक आदेश काढत पूर्वीच्या भाजप सरकारने नेमलेले महामंडळाचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले होते. त्यानंतर आज हे महामंडळ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हाती सोपवले गेले आहे.

(  संपादन - सुमित बागुल )

responsibility of Annasaheb Patil Mahamandal finally given to Ajit Pawar planning department

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.