मुंबई : क्रेडिट कार्डनं पॉर्न वेबसाईट्सवर पॉर्न क्लिप खरेदी करण्याची सुविधा देणं बंद करा अशी मागणी केली जात आहे. जगभरातल्या दहा संस्थांनी ही मागणी केली आहे. या दहाही संस्था लैंगिक शोषणाविरोधात काम करतात. या सर्व संस्थांनी एक पत्र लिहिलं आहे. ज्या पत्रावर दहा संस्थांच्या स्वाक्षऱ्या आहे. या 10 संस्थांमध्ये भारतातील अपने आप या संस्थेचाही सहभाग आहे.
काय म्हटलं आहे या पत्रात
जगभरात असलेल्या पॉर्न साईट्स लैंगिक हिंसाचाराला, व्याभिचार आणि वर्णद्वेषाला आमंत्रण देतात. बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि सेक्स ट्रॅफिकिंग यांसारख्या विषयांवरील मजकूर सुद्धा पॉर्न साईट्स प्रसारित करतात, असं या पत्रात नमूद केलं आहे. पॉर्नहब या वेबसाईटनं याबाबत म्हटलंय की, हे पत्र केवळ तथ्यांच्या बाबतीत चूक नाही, तर जाणीवपूर्वक दिशाभूल करणारंही आहे.
बीबीसीनं दिलेल्या वृत्तानुसार, मास्टरकार्ड या पेमेंट कार्ड कंपनीनं बीबीसीला सांगितलं की, या 10 ही संस्थांनी केलेल्या दाव्यांची चौकशी आम्ही करत आहोत. तसंच या चौकशीत कुठल्याही कार्ड होल्डरकडून अवैध कृती आढळली, तर आमच्या नेटवर्कमधून त्याचं कार्ड बंद करू.
समाजसेवी संस्थाकडून विनंती पत्र
समाजसेवा संस्थांनी बिग थ्री, व्हिसा, मास्टरकार्ड आणि अमेरिकेन एक्स्प्रेस यांसह एकूण दहा कंपन्यांना पत्र लिहून ही विनंती केली आहे. यात भारत, अमेरिका, ब्रिटन, युगांडा, ऑस्ट्रेलिया यांसारख्या समाजसेवी संस्थांचा समावेश आहे. या पत्रात संस्थांकडून पॉर्न वेबसाईट्सना कार्डद्वारे देण्यात येणारे पेमेंटचे पर्याय तातडीनं रद्द करण्याची विनंती करण्यात आलीय. विशेष म्हणजे, नॅशनल सेंटर ऑन सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन (NCOSE) या अमेरिकेतली संस्थेसह स्त्री हक्क, बालहक्कांसाठी लढणाऱ्या संस्थांचा समावेश पत्र पाठवणाऱ्यांमध्ये आहे.
खालील दिलेल्या संस्थांनी याबाबत पत्र पाठवलं आहे.
हॅली मॅकनमारा या यूकेतील इंटरनॅशनल सेंटर ऑन सेक्शुअल एक्सप्लॉटेशनच्या संचालक आहेत. हॅली यांनी क्रेडिट कार्ड कंपन्यांनाही पत्र पाठवलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, गेल्या काही दिवसांपासून पॉर्न वेबसाईट्समुळे होणारे दुष्परिणाम जगभरात वाढत असल्याचं दिसतंय.
पॉर्नहब या ऑनलाईन वेबसाईटवर सर्वात जास्त पॉर्न पाहिले जातात, असं आंतरराष्ट्रीय समाजसेवी संस्था आणि व्यक्तींनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे. पॉर्नहब साईटवरील व्हिजिट आकडा पाहिल्यानंतर तो एक प्रकाराचा धक्काच बसेल. 2019 ला या साईटवर 42 अब्जाहून अधिक व्हिजिट्स नोंदवण्यात आल्यात. म्हणजेच 11 कोटी 50 लाख एका दिवसाला या साईटला व्हिजिट मिळतात.
गेल्यावर्षी या वेबसाईटची चौकशी करण्यात आली होती. गर्ल्स डू पॉर्न या पॉर्न प्रोव्हयडरची FBI (फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन) नं एका प्रकरणात चौकशीही झाली आहे. चौकशीनंतर पॉर्नहबनं तातडीनं गर्ल्स डू पॉर्न चॅनेल काढून टाकलं.
लैगिंक शोषणाचे व्हिडिओ वेबसाईटवर अपलोड
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात फ्लोरिडातील ख्रिस्तोफर जॉन्सन या 30 वर्षांच्या व्यक्तीवर 15 वर्षीय मुलीचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली होती. त्याने शोषणाचे व्हीडिओ पॉर्नहबवरच अपलोड केले होते.
यूकेमधील इंटरनेट वॉच फाऊंडेशन या संस्थेनं दिलेल्या आकडेवारीनुसार, 2017 ते 2019 या दोन वर्षात पॉर्नहब या वेबसाईटवर 118 व्हिडिओ सापडलेत. ज्या व्हिडिओमध्ये बालकांचं लैंगिक शोषण, बालकांवर बलात्कार अशा प्रकारचा मजकूर होता. यूकेची ही संस्था ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरील लहान मुलांच्या लैंगिक शोषणाविरोधात काम करते.
पॉर्नहब वेबसाईटनं पत्राला म्हटलं तथ्यहिन
दरम्यान विविध संस्थांनी एकत्र मिळून पाठवलेल्या पत्राला पॉर्नहबनं तथ्यहिन म्हणत हे पत्र दिशाभूल करणारं असल्याचीही टीका केलीय.
दुसरीकडे अमेरिकन एक्स्प्रेस या क्रेडिट कार्ड कंपनीनं 2000 सालापासूनच पॉर्न वेबसाईट्ससाठी पेमेंट सुविधा बंद करण्याचं धोरणं ठेवलं आहे. मात्र हे पत्र अमेरिका एक्स्प्रेसला पाठवलं आहे. कारण अजूनही पॉर्न वेबसाईट्सवर पेमेंटच्या पर्यायामध्ये अमेरिकन एक्स्प्रेसचाही पर्याय दिसतो.
व्हिसा आणि मास्टरकार्डसारख्या इतर मोठ्या क्रेडिट कार्ड कंपन्यां ऑनलाईन पॉर्न खरेदीसाठी क्रेडिट आणि डेबिट कार्ड अशा दोन्ही सुविधा देतात. त्यावर मास्टरकार्डनं बीबीसीला ईमेलद्वारे स्पष्टीकरण दिलं आहे. त्यानंतर बीबीसीनं दिलेल्या वृत्तानुसार, मास्टराकार्डचं म्हणणं आहे की, या संस्थांनी पाठवलेल्या पत्रातील दाव्यांचा शोध घेतला जाईल.
ऑनलाईन कंपन्यांकडून सकारात्मक पावलं
काही पेमेंट कंपन्यांनी ऑनलाईन पॉर्न वेबसाईट्सपासून दूर राहण्यासाठी काही ठोस पावलं उचचली असल्याची माहिती बीबीसीनं दिली आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये Paypal या ऑनलाईन पेमेंट कंपनीनं जाहीर केलं की, यापुढे पॉर्नहबवर कुठलीही पेमेंट सुविधा दिली जाणार नाही.
पेमेंट बंद केल्यास काय होईल
बीबीसीनं दिलेल्या वृत्तात, आपलं नाव न सांगण्याच्या अटीवर पॉर्नहब परफॉर्मरनं सांगितलं की, पेमेंट कंपन्यांनी सुविधा पुरवणं बंद केल्यास आम्ही उद्ध्वस्त होऊ. कारण की आमचा फायदा केवळ त्यातूनच होतो.
restrictions may imposed on buying that type of content by credit card
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.