कामचुकार सेवानिवृत्त अधिकारी पुन्हा सेवेत; मीरा भाईंदर पालिकेचा प्रताप

कामचुकार सेवानिवृत्त अधिकारी पुन्हा सेवेत; मीरा भाईंदर पालिकेचा प्रताप
Updated on

भाईंदर ः अकार्यक्षम आणि कामचुकार सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना ठेका पद्धतीने मिरा-भाईंदर महानगरपालिका सेवेत मागच्या दाराने घेण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन आहे. या अधिकाऱ्यांना जर पुन्हा पालिका सेवेत घेण्याचा प्रयत्न झाल्यास हा डाव भाजपा उधळून लावल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा सभागृह नेते प्रशांत दळवी यांनी दिला आहे. या सगळ्या प्रकरणात पालिका प्रशासना कडे चौकशी केली असता असा कोणताही प्रस्ताव प्रशासनापुढे आला नसल्याचे सांगण्यात आले आहे. 

मिरा-भाईंदर महानगरपालिकेतील प्रभाग अधिकाऱ्यांवरील वाढता ताण लक्षात घेऊन प्रशासनाने वर्ग 2 मधील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना प्रभाग निहाय कार्यालयीन कामकाजासाठी प्रशासकीय अधिकारी म्हणून मानधनावर घेण्याचा प्रयत्न चालविला आहे. या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांमध्ये गोविंद परब, वसंत राणे आणि विजय पाटील यांचा समावेश असल्याची चर्चा आहे. 

- वरिष्ठ लिपिकांची नेमणुक करण्याची मागणी 
मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यांवर कामाचा ताण वाढला गेला असल्यास त्यांच्या मदतीला महापालिका सेवेतील वरिष्ठ लिपिकांची नेमणूक करण्यात यावी. जेणेकरून या वरिष्ठ लिपिकांना नव्या कामकाजाचा अनुभव घेता येईल. तसेच भविष्यकाळात प्रभाग अधिकारी या पदावर या वरिष्ठ लिपिकांची नियुक्ती झाल्यास त्यांना प्रभाग अधिकारी म्हणून काम करणे सुलभ जाईल, असेही प्रशांत दळवी यांनी आयुक्त डॉ. विजय राठोड यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. 

ठेका पद्धतीने या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना तीस हजार रूपये इतक्‍या मानधनावर घेऊन महानगरपालिकेचा कोणत्याही प्रकारचा आर्थिक लाभ होणार नाही. उलट महानगरपालिकेचे या मानधनापोटी लाखो रूपये वाया जाण्याचीच दाट शक्‍यता आहे. सबब या अधिकाऱ्यांना पालिका सेवेत घेण्याचा प्रयत्न झाल्यास प्रशासनाचा हा डाव उधळून लावल्याशिवाय भाजपा स्वस्थ बसणार नाही, 
- प्रशांत दळवी,
सभागृह नेते, मीरा-भाईंदर महापालिका 

सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचा कोणताही प्रस्ताव सद्य तरी प्रशासनापुढे नाही. 
सुनील यादव,
आस्थापना विभाग अधिकारी, मीरा-भाईंदर महानगर पालिका

retired officers reenter in Mira Bhayander Municipality

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.