लाॅकडाऊन काळात रेल्वे मालवाहतुकीमुळे 'मालामाल'; गेल्या वर्षीच्या तुलनेत महसूलात 4.3 टक्याने वाढ

लाॅकडाऊन काळात रेल्वे मालवाहतुकीमुळे 'मालामाल'; गेल्या वर्षीच्या तुलनेत महसूलात 4.3 टक्याने वाढ
Updated on



मुंबई  - कोव्हिड -19 च्या संकटकाळातही मालवाहतुकीला चालना देण्यासाठी भारतीय रेल्वेने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. ज्याचा परिणाम म्हणून, ऑगस्ट महिन्यात, गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्याच्या मालवाहतुकीच्या तुलनेत 4.3 टक्के वाढ झाली आहे. यावर्षी 27 ऑगस्ट पर्यंत एकूण 81.33 दशलक्ष टन मालवाहतूक झाली, तर गेल्यावर्षी ही मालवाहतूक केवळ 77.97 दशलक्ष टन इतकीच झाली होती.

कोव्हिड 19 च्या महामारीतील संकटाची संधी म्हणून वापर करत, भारतीय रेल्वेने मालगाडयांचा वेग लक्षणीयरीत्या वाढवला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत, मालवाहतुकीच्या वेगात 72 टक्के वाढ झाली आहे. तर ऑगस्ट 2019 च्या तुलनेत ऑगस्ट 2020 मध्ये मालगाडयांचा वेग 94 टक्के वाढला आहे. मालवाहतुकीला चालना देण्यासाठी शुल्क तर्कसंगत करण्याच्या दृष्टीने रेल्वेने अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहे. 

रेल्वेच्या उपाययोजना
- माल भरलेल्या कंटेनरवर 3 ऑगस्ट पासून 5 टक्के सवलत.
- उर्जा प्रकल्प, सिमेंट प्रकल्पासाठी पॉंड ऍश,ओलावा असलेली राख मालावाहतुकीवर 40 टक्के सवलत 
- औद्योगिक मीठाच्या वर्गीकरणात बदल करून 3 ऑगस्ट पासून रसायन उद्योगासाठीच्या मीठाचे वर्गीकरण 120 पासून 100A श्रेणीत
- मालवाहतूक होणाऱ्या खाजगी गाड्या आणि वाहने ठेवून घेण्यासाठी लागणारे शुल्क 3 ऑगस्ट ते 31 ऑक्टोबर पर्यंत रद्द.
- व्यस्त हंगामात लावले जाणारे विशेष शुल्क रद्द 
–कोळसा, लोहखनिज आणि कंटेनर वगळता इतर क्षेत्रातील सर्व मालवाहतुकीवरील 15 टक्के शुल्क 1 ऑक्टोबर पासून माफ
- सिमेंट, लोह आणि पोलाद, अन्नधान्य, खते आणि घाऊक यांच्या दोन टप्पे, छोटे डबे यातून होणाऱ्या मालवाहतुकीवरील 5 % अधिभार 1 ऑक्टोबरपासून  रद्द
- ओपन वॅगन मधून उर्जा प्रकल्प, सिमेंट प्रकल्पासाठी केल्या जाणाऱ्या फ्लाय ऍशच्या मालवाहतुकीवर  40 टक्के सवलत, 10 मे पासून लागू.
- पर्यायी टर्मिनल व्यवस्था प्रति रेक 56 हजार ते 80 हजार रुपये 27 जुन पासून सर्वक्षेत्रांसाठी लागू
- राऊंड ट्रीप शुल्क धोरण सर्व क्षेत्रांसाठी निम्न श्रेणीतील दर 1 जुलै पासून लागू.
- लाँग लीड सवलत- कोळसा, लोह खनिज, आणि पोलाद यावर 1 जुलै पासून 15 ते 20 टक्के सवलत
- शॉर्ट लीड सवलत 10 ते 50 टक्के सर्व क्षेत्रांसाठी कोळसा आणि लोहखनिज वगळता 1 जुलै पासून लागू .

मालवाहतुकीला चालना देण्यासाठी अशुल्क क्षेत्रात रेल्वेने केलेल्या उपाययोजना 
- वाहन वाहतुकीसाठी दोन टप्प्यांत वाहन उतरवण्यासाठी परवानगी 5 ऑगस्ट पासून लागू
- सर्व क्षेत्रात, खाजगी वाहतुकीत इतर वापरकर्त्यांवर घालण्यात आलेली मर्यादा रद्द करण्यात आली आहे. निर्णय 18 ऑगस्टपासून लागू.
- पार्सल ट्राफिकसाठी सर्व खाजगी सायडिंग, मालसाठा, खाजगी माल टर्मिनल सुरु करण्यात आले आहे. निर्णय 18 ऑगस्टपासून लागू.
- इण्डेनटेड पार्सलच्या छोट्या आकाराच्या बांधणीत 31 मार्च 2021 पर्यंत वाढ. 
- वेळापत्रकानुसार चालणाऱ्या पार्सल ट्रेन एक्सप्रेसमध्ये वाढ-31 डिसेंबरपर्यंत लागू.
----------------------
उद्योग विकास विभागांची स्थापना  
नाशिकच्या देवळालीपासून ते पाटण्याच्या दानापूर पर्यंत किसान रेल सुरु करण्यात आली असून, अनेक ठिकाणी थांबे, विविध वस्तू, विविध शेतकऱ्यांच्या मालाची वाहतूक केली जात आहे. ही ट्रेन आता मुझफ्फरपूर पर्यंत वाढवण्यात आली असून त्याला कोल्हापूर ते मनमाड ही लिंक देखील जोडण्यात आली आहे. 24 ऑगस्ट पासून ही गाडी आठवड्यात दोनदा धावत असून आतापर्यंत चार फेऱ्या पूर्ण करण्यात आल्या आहे. 

------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.