नवी मुंबई : नववर्षाच्या स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात आली असताना सरणारे २०१९ हे वर्ष विधानसभा निवडणुकीच्या उलथापालथीमुळे नवी मुंबईकरांच्या स्मरणात राहणार आहे.
गेली २० वर्षे नवी मुंबईत राष्ट्रवादीचा एकसूत्री कार्यक्रम राबवणाऱ्या नाईक कुटुंबीयांनी ऐनवेळी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये केलेल्या प्रवेशाने नवी मुंबईच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळाली; तर आमदार मंदा म्हात्रे यांनी भाजपमधून सलग दुसऱ्यांदा विजयश्री खेचून आणून मोदी लाटेवरील ओंडके अशी टीका करणाऱ्या विरोधकांची तोंडे कायमची बंद केली.
ही बातमी वाचली का? : राज्यात प्रथमच...हे झाले, 'या' अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल!
एकामागून एक आलेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकांमुळे २०१९ हे वर्ष प्रचंड राजकीय रणधुमाळीचे ठरले. सरते वर्षे नाईकांच्या पक्षांतरामुळे ऐतिहासिक ठरले. आचार-विचाराने राष्ट्रवादीत असणाऱ्या नाईकांना पुत्रमोहापोटी अखेर संघ विचारसरणीवर चालणाऱ्या भाजपत जावे लागले. नाईक पक्षात येणार म्हणून भाजपमधील अंतर्गत वाद उफाळून बाहेर येण्यास सुरुवात झाली होती. नाईकांसाठी खास दिल्लीश्वरांच्या उपस्थित प्रवेशाचा कार्यक्रम उरकला जाणार होता. मात्र, तारखा मिळू न शकल्याने अखेर देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित हा प्रवेशाचा सोहळा पार पडला. पक्षप्रवेश केल्यानंतरही नाईकांच्या वाट्याला किती जागा येतात, यावरून चुरस निर्माण झाली होती. कार्यकर्त्यांकडून समाजमाध्यमांवर जोरदार शाब्दिक युद्ध रंगल्यामुळे राजकीय उत्सुकता शिगेला पोहोचली होती. यात शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनी बेलापूरच्या जागेवर दावा करून आणखीन पेच वाढवला होता.
बेलापूरच्या जागेवर स्थानिक आमदार मंदा म्हात्रे, गणेश नाईकांपाठोपाठ विजय नाहटा यांच्यात स्पर्धा सुरू झाली होती. बेलापूरच्या जागेवरून शिवसेना-भाजप महायुतीचा निर्णय रखडल्याने साऱ्या राज्याचे लक्ष बेलापूरच्या जागेकडे लागून राहिले होते. अखेर मंदा म्हात्रेंच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली; तर ऐरोलीची सुभेदारी संदीप नाईकांना मिळाली. परंतु इथेच राजकारण संपले नव्हते. भाजपमध्ये आलेल्या नाईक समर्थक नगरसेवकांनी पुन्हा गणेश नाईकांना आग्रह केल्यामुळे लोकाग्रहाखातर नाईकांना संदीप यांच्याऐवजी स्वतःला रिंगणात उतरावे लागले. नाईक भाजपमध्ये आले असले तरी मंदा म्हात्रे यांची बेलापूरमधील लढाई सोपी नव्हती. बेलापूरमध्ये म्हात्रेंसमोर राष्ट्रवादीतून माजी उपमहापौर नगरसेवक अशोक गावडे आणि मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांचे आव्हान होते.
व्यक्तिकेंद्रीत राजकारणाचा फटका
ज्यांच्या नावाने नवी मुंबईला ओळखले जायचे, असे आमदार गणेश नाईकांनी पुत्र माजी आमदार संदीप नाईक, माजी खासदार संजीव नाईक व पुतण्या माजी महापौर सागर नाईक यांच्यासोबत भाजपमध्ये डेरेदाखल झाले. त्यामुळे सरत्या वर्षातील राजकारणात व्यक्तिकेंद्रीत राजकारणावर अवलंबून असणाऱ्या राष्ट्रवादीला पुन्हा अस्तित्वाची लढाई करावी लागली.
मनसेने वलय तयार केले
नवी मुंबईतील बेलापूर आणि ऐरोली या दोनही जागांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोठी मुसंडी मारली. कधी नव्हे ते मनसेने या परिसरात ५० हजारांपेक्षा जास्त मते घेऊन, तिसरा सर्वात मोठा पक्ष होत स्वतःचे वलय तयार केले.
review of political happening of Navi mumbai in the year 2019
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.