Rice Farming: पावसाच्या अनियमिततेचा खेळ पुन्हा सुरु, शेतातील पेरणी वाया जाण्याची भिती

Latest Farming updates: भात पिकासाठी आवश्यक पाऊस ग्रामीण भागात होत नसल्याने भात पिक लागवड यंदा उशिरा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
Rice Farming: पावसाच्या अनियमिततेचा खेळ पुन्हा सुरु, शेतातील पेरणी वाया जाण्याची भिती
Rice Farmingsakal
Updated on

Dombivli: ठाणे जिल्ह्यात पावसास सुरुवात झाल्यानंतर बळीराजा सुखावला होता. पाऊस होताच अंबरनाथ तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतात भात पिकाची पेरणी केली आहे. हवामान विभागाने येत्या आठवड्यात जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली होती. मात्र गेल्या दोन तीन दिवसांपासून पाऊस अचानक गायब झाला आहे.

कडक ऊन पडत असून पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकरी राजा चिंतेत पडला आहे. पाऊस येणार या आशेवर शेतकऱ्यांनी पिकांची पेरणी केली आहे.

मात्र आता ही पेरणी उगवणार कशी तसेच उगवलेले पिक जगेल का ? हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहीला आहे. वेळेत पाऊस झाला नाही तर भाताचे पिक करपण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

जून महिन्याच्या सुरुवातीलाच ठाणे जिल्ह्यात पावसाने आपली दमदार हजेरी लावली. कल्याण येथील अंबरनाथ तालुक्यातील श्री मलंग पट्ट्यात चांगला पाऊस झाल्याने शेतकरी राजा सुखावला होता. हवामान विभागाने देखील जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तविला होता. जिल्ह्यात डोंगराळ भागात दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी शेतात भातासोबतच इतर पिकांची लागवड करण्यास सुरुवात केली आहे.

भात पिकाची पेरणी अनेक शेतकऱ्यांनी पूर्ण केली आहे. परंतू गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. ढगांची नुसतीच गर्दी होते, मात्र पाऊस पडत नाही असे काहीसे वातावरण या भागात आहे.

तर ढगांची गर्दी हटताच कडक ऊन पडत आहे. अजून काही दिवस पावसाने हजेरी न लावल्यास पेरणी केलेली भात पिक पाण्यावाचून करपून जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे हे पावसाच्या आगमनाकडे लागले आहेत.

अंबरनाथ तालुक्यात जवळपास 90 टक्के पेरणी प्रक्रीया ही पूर्ण झालेली आहे. लागवड केलेले बियाणे देखील उगवले असून खऱ्या अर्थाने या पिकांना पाण्याची आवश्यकता आहे.

मात्र पाऊस होत नसल्याने हे पिक जगवायचे कसे हा मोठा प्रश्न येथील शेतकऱ्यांसमोर आहे. ओढ्या नाल्यांना देखील पाणी नसल्याने या पिकांना पाणी द्यायचे कोठून या चितेंत शेतकरी आहे. पेरणी केलेल्या भात पिकासाठी आवश्यक पाऊस ग्रामीण भागात होत नसल्याने भात पिक लागवड यंदा उशिरा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.