रायगड जिल्ह्यात म्हणून आहे, हुडहुडी

रायगड जिल्ह्यात म्हणून आहे, हुडहुडी
Updated on

रोहा : रायगड जिल्ह्यात थंडीने पुन्हा जोर धरला आहे. सध्या वारेही वाहत असल्याने थंडी बोचरी झाली आहे. गेल्या १५ दिवसांपूर्वीही थंडीने असाच जोर धरला होता. हवामान विभागाच्या माहितीनुसार रोह्यात अनेक तालुक्‍यांतील रात्रीचे तापमान किमान १०-१२ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. 

रोहा, अलिबाग, कर्जत, खोपोली, सुधागड पाली, रोहा, माणगाव, महाड, पोलादपूर तालुक्‍यात अधिक थंडी आहे. या वर्षी पावसाचा मुक्काम नोव्हेंबर महिन्यापर्यंत कायम होता. त्यामुळे हिवाळा उशिराने सुरू झाला. 

महाड शहरातील बुधवारी रात्रीचे किमान तापमान २० अंश सेल्सिअस, तर रोह्याचे १० अंश शेल्सियस होते. महाडचे कमाल तापमान १६ अंश सेल्सिअस नोंदवले आहे. मागील आठवड्यापेक्षा आता थंडीचा जोर अधिक वाढला असून रविवारपर्यंत हा जोर कायम राहणार आहे. त्यानंतर पुन्हा तापमानात हळूहळू वाढ होणार असल्याचे हमामानविषयी अंदाज वर्तवणाऱ्या काही वेबसाईटने वर्तवला आहे. 

जिल्ह्याचे शहर, समुद्र किनारा व पर्यटन स्थळ असलेल्या अलिबाग शहरात रात्री किमान तापमान १६ अंश सेल्सिअस; तर कमाल तापमान २५ अंश सेल्सियस होते; तर माथेरानचे १२.८ होते.  
रोह्यातील रहिवाशांनी सांगितले की, बुधवारी मकर संक्रांतीच्या रात्रीपासून थंडीचा जोर अचानक वाढला. त्यामुळे उबेसाठी ग्रामीण भागात शेकोट्या पेटल्या. शहरी भागात स्वेटर, मफलर, कानटोप्या यांसारख्या उबदार कपड्यांचा आधार घेतला जात आहे. 

हे वाचा : बस अपघातात २० विद्यार्थी जखमी

किनारे ओस 
रायगड जिल्ह्यात दोन दिवसांपासून बोचरी थंडी जाणवू लागली आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्या कमालीची घटली आहे. मुरूड, अलिबाग, श्रीवर्धनचे समुद्र किनारेही पर्यटकांअभावी ओस आहेत. मुरूडमधील व्यवसायिकांनी सांगितले की, पर्यटकांची संख्या कमालीची रोडावली आहे. त्यामुळे व्यवसाय ठप्प आहेत. थंडीचा जोर कमी झाल्यानंतर पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल. यंदा पर्यटन हंगाम चांगला आहे, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.