विरार : वाट चुकून जळगावला गेलेल्या 'त्या' मुलीचा शोध लागला

नायरा फाउंडेशन आणि पोलिसांच्या मदतीने सुखरूप पोहोचली घरी
Lost girl found
Lost girl foundsakal media
Updated on

विरार : वसई (Vasai) तालुक्यातील मजिवली गावातील वीटभट्टीवर काम करण्यासाठी भिवंडी येथे गेलेली मुलगी घरी यायला निघाली, मात्र वाट चुकल्याने ती थेट जळगाव (Jlagaon) मधील पारोळा येथे पोहोचली. रुपाली कृष्णा फसाले (Rupali fasale) (15) असे या मुलीचे नाव असून, पोलीस आणि नायरा फाउंडेशनचे (Nayara Foundation) अध्यक्ष रोहन गायकवाड (Rohan Gaikwad) यांच्या मदतीने ती सुखरूप घरी पोहोचली. त्यामुळे रुपालीच्या कुटुंबियांनी पारोळा आणि मांडवी पोलीस (Mandavi police) यांच्यासह गायकवाड यांचे आभार मानले असून रोहन गायकवाड यांच्या सेवाभावी वृत्ती आणि संवेदनशिलतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Lost girl found
'त्या' अभिनेत्रींच्या संपर्कातील 110 जणांची चाचणी; 4 इमारती सील

पालघर जिल्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातून आजही अनेक गरीब आदिवासी पोटाची खळगी भरण्यासाठी रोजगार मिळेल त्या ठिकाणी स्थलांतरित होत असतात. असेच आपल्या नातेवाईकांसोबत वीटभट्टीवर काम करण्यासाठी वसई तालुक्यातील मजिवली गावातील रुपाली कृष्णा पासले (15) ही मुलगी देखील भिवंडी येथे गेली होती. दोन दिवसांपूर्वी रुपाली भिवांडीहून घरी येण्यासाठी निघाली खरी, मात्र चुकीच्या वाहनात बसल्याने ती नकळत जळगाव परोळ्यात जाऊन पोहोचली. पारोळा पोलिसांनी रुपलीला गोंधळलेल्या स्थितीत बघताच तिची चौकशी केली असता तिने गावचा पत्ता सांगितला.

आणि आपण रस्ता चुकून वाहने बदलत येथपर्यंत पोहोचल्याचे पोलिसांना सांगितले. त्यावेळी पारोळा पोलिसांनी तात्काळ वसई पोलिस आणि मग मांडावी पोलिसांना संपर्क करून रुपाली बाबत माहिती दिली. मांडावी पोलिसांनी माजीवली गावच्या पोलीस पाटील यांच्या मार्फत रुपालीच्या घरच्यांशी संपर्क केला असता, रुपाली भिवंडी येथून घरी येण्यासाठी निघाली मात्र अद्याप पोहोचली नसल्याचे सांगितले.

Lost girl found
डोंबिवली : दोन सराईत मोटारसायकल चोर अटकेत

पोलिसांनी रुपाली सुखरूप असल्याचे सांगताच तिच्या कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला. परंतु रुपालीच्या त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने जळगाव हून रुपालीला घरी कसे आणायचे .? घरात दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या कुटुंबाने जळगांवला जाऊन मुलीला घेऊन परत यायचे म्हटले तर, १२ ते १५ हजार रुपये खर्च येणार असल्याने ते चिंतेत होते.

त्यामुळे रूपालीला परत आणण्यासाठी येणारी अडचण श्रमजीवी सेवादलाचे कार्यवाहक निलेश वाघ यांच्या लक्षात आली, त्यांनी तात्काळ याबाबतची माहिती आयटी तज्ज्ञ आणि नायरा फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन गायकवाड यांना दिली. सदर अडचण रोहन गायकवाड यांना समजताच त्यांनी तात्काळ मदत करून रुपलील पारोळा येथून आणण्याची सर्व व्यवस्था केली आणि तिला सुखरूप तिच्या घरी पोहचवले. यावेळी त्यांच्यासोबत निलेश वाघ आणि विलास मोरघे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.