मोखाडा - डहाणू-नाशिक रेल्वे मार्गाची गेली अनेक दशकांची मागणी आहे. ही मागणी केंद्र शासनाकडे आजही प्रलंबित आहे. आदिवासी भागाच्या सर्वांगीण विकासासाठी डहाणू-नाशिक या रेल्वे मार्गाला, पर्यायी उमरोळी-विक्रमगड-जव्हार-मोखाडा-खोडाळा- ईगतपुरी आणि ठाणे-भिवंडी-अंबाडी-वाडा-जव्हार- मोखाडा-त्र्यंबकेश्वर-नाशिक या दोन नवीन रेल्वे मार्गाची मागणी खासदार डॉ. हेमंत सावरा यांनी रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांची भेट घेऊन केली आहे.
पालघर, ठाणे आणि नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर रेल्वे ची सुविधा असणे आवश्यक आहे. डहाणू-नाशिक या रेल्वे मार्गाची गेली अनेक दशकांची मागणी आहे. त्यासाठी दिवंगत माजी खासदार अॅड. चिंतामण वनगा यांनी आपल्या अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले होते. त्यांच्या निधनानंतर ही मागणी कालबाह्य झाली होती.
मात्र, खासदार डॉ. हेमंत सावरांनी पुन्हा डहाणू-नाशिक या रेल्वे मार्गाची मागणी केली आहे. या मागणीसह उमरोळी-विक्रमगड-जव्हार-मोखाडा-खोडाळा- ईगतपुरी आणि ठाणे-भिवंडी-अंबाडी-वाडा-जव्हार- मोखाडा-त्र्यंबकेश्वर-नाशिक ह्या पर्यायी दोन रेल्वे मार्गाला मंजुरी देऊन किसान रेल सुरू करावी अशी मागणी रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
खासदार डॉ. हेमंत सावरा यांनी रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांची भेट घेऊन DFCC- रेल्वे मार्गाखाली पाणी साचते त्याबाबत उपाय करणे, नवीन रेल्वे गाड्या सुरू करणे, पालघर जिल्ह्यातील रेल्वेच्या समस्या त्यावर उपाययोजना करणे, बाहेरगावी जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना, पालघर लोकसभा क्षेत्रामध्ये थांबे देण्यात यावे याविषयी चर्चा करून तातडीने समस्या सोडविण्याची मागणी केली आहे.
पालघर, ठाणे आणि नाशिक या जिल्ह्यातील आदिवासी भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी, डहाणू- नाशिक या जुन्या रेल्वे मार्गासह त्याला दोन पर्यायी रेल्वे मार्गाची मागणी रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव यांच्याकडे केली आहे. हा रेल्वे मार्ग अस्तित्वात आल्यास, आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊन विकासाला चालना मिळु शकेल. नाशिक आणि गुजरातच्या औद्योगिक वसाहतींना जोडणारा मधला मार्ग ठरेल. तसेच चाकरमानी आणि व्यापार्यांची होणारी गैरसोय टळेल अशी चर्चा देखील केली आहे.
- डॉ. हेमंत सावरा, खासदार पालघर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.