TRP घोटाळा प्रकरण : रिपब्लिकचे CFO आज चौकशीसाठी उपस्थित राहणार नाहीत

TRP घोटाळा प्रकरण : रिपब्लिकचे CFO आज चौकशीसाठी उपस्थित राहणार नाहीत
Updated on

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी TRP घोटाळा उघडा केला गेला होता.  ज्या घरांमध्ये TRP मोजण्याचे बॅरोमीटर्स बसवण्यात आलेत त्यांना पैसे देऊन एकच चॅनल लावण्यास सांगितलं जायचं. याप्रकरणी फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या दोन लहान तर रिपब्लिक टीव्ही या मोठ्या चॅनलचं नाव या घोटाळ्यात समोर येतंय. TRP घोटाळा प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे CFO म्हणजेच वित्तीय अधिकारी याना आज चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी समन्स बजावला होता. मात्र रिपब्लिकचे वित्तीय अधिकारी आज चौकशीसाठी जाणार नाहीत. रिपब्लिकच्या अधिकाऱ्यांकडून कामाची सबब आणि वेलीची मागणी केली गेलीये. 

सुंदरम हे रिपब्लिक टीव्हीचे CFO आहेत. मुंबई पोलिसांनी त्यांना समन्स पाठवून चौकशीसाठी पाचारण केलं होतं. मात्र सुंदरम यांनी मुंबई पोलिसांना एक पत्र दिलंय. या पत्रात त्यांनी सुप्रीम कोर्टात आपण एक याचिका दाखल केली असल्याची माहिती दिली. त्या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणीची मागणीही त्यांनी केली आहे. पुढील आठवड्यात त्या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जोपयर्यंत या याचिकेवर निकाल येत नाही तोवर मुंबई पोलिसांमार्फत चौकशी केली आणि रिपब्लिक  टीव्हीकडून कोणतीही बाजू मांडण्यात येणार नाही असं या पत्रात म्हटलंय. याव्यतिरिक्त सुंदरम यांचं असंही म्हणणं आहे की, ते सध्या मुंबई बाहेर आहेत. १५ तारखेनंतर ते मुंबईत येतील आणि त्यानंतर ते चौकशीसाठी उपलब्ध असतील असं त्यांनी सांगितलं आहे. 

एकूणच रिपब्लिक टीव्हीने या तपासाला सहकार्य करायचं नाही असा सूर एकंदर आज समोर येणाऱ्या माहितीवरून पाहायला मिळतोय असं म्हंटल तर वावगं ठरू नये. 

s sundaram cfo of republic tv will not present for the interrogation done by mumbai police 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()