फक्त तेंडुलकरच नाही तर बच्चनचा बंगला देखील होणार मोठा; अदनीचे व्याही देखील त्या यादीत...

Sachin Tendulkar Amitabh Bachchan beach bungalow gets CRZ permits for additional construction
Sachin Tendulkar Amitabh Bachchan beach bungalow gets CRZ permits for additional construction
Updated on

भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि बॉलिवुडचे अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या मुंबईतील बंगल्यामधील अतिरिक्त बांधकामासाठी सागरी नियमन क्षेत्र कायदा (CRZ) कायद्यांतर्गत परवानगी देण्यात आली आहे.

ही परवानगी मिळाल्याने आथा सचिन तेंडुलकर आणि बच्चन कुटुंबियांना त्याच्या बंगल्यामध्ये बांधकाम करता येणार. सचिन तेंडुलकरचा मुंबईतील कार्टर रोड परिसरात समुद्राला लागून बंगला आहे. त्यांच्या या बंगल्याला २०११ साली परवानगी देण्यात आली होती.

Sachin Tendulkar Amitabh Bachchan beach bungalow gets CRZ permits for additional construction
KKR News : रिंकूने ५ छक्के ठोकले… पण KKRच्या डगआऊटमधला 'तो' दु:खी दाढीवाला कोण?

हा सागरी हद्दीत असल्याने बंगल्याला १ फ्लोअर स्पेस इंडेक्स देण्यात आला होता. त्यानंतर तेंडुलकर यांच्याकडून अतिरिक्त परवानगीसाठी अर्ज करण्यात आला होता. या अर्जात चौथा आणि पाचवा मजला बांधण्यासाठी परवानगी माहण्यात आली होती.त्यानंतर सीआरझेड कायद्यातंर्गत त्यांना बंगल्यातील अतिरिक्त बांधकामाला परवानगी देण्यात आली आहे.

हेही वाचा - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

जुहू येथील कपोल सोसायटीमध्ये अमिताभ बच्चन यांचा जलसा हा बंगला आहे. या बंगल्यात अतिरिक्त बांधकामासाठी जया बच्चन यांच्याकडनही परवानगी मागण्यात आली होती. बच्चन यांच्या या बंगल्याच्या बांधकामाला १९८४ मध्ये परवानगी देण्यात आली होती.

जया बच्चन यांनी केलेल्या अर्जानुसार जलसा बंगल्याचा दुसरा मजला बांधण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती. बच्चन यांचा प्रस्ताव निकषात बसत असल्यामुळे या बांधकामाला परवानगी देण्यात आला आहे.

Sachin Tendulkar Amitabh Bachchan beach bungalow gets CRZ permits for additional construction
Pune Politics News : पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढवणार का? रवींद्र धगेंकरांनी दिलं उत्तर

सचिन तेंडूलकर आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबतच गौतम अदानी यांचे व्याही सिरिल श्रॉफ यांच्या वरळी सीफेसवरील बंगल्याच्या वाढीव बांधकामासाठी परवानगी देण्यात आली आहे. २०१९ मधील सीआरझेड अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी, शर्थींच्या अधीन राहूनच वाढीव बांधकाम करावे, असे मंजुरी देताना स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.