Sachin Tendulkar: मास्टर ब्लास्टरला जंगल सफारीचे वेड; सचिनला वाटते ताडोबा घरासारखे

पाचव्यांदा ताडोबा सफारी
sachin
sachinesakal
Updated on

चिमूर: क्रिकेट विश्वातील देव समजल्या जाणाऱ्या मास्टर ब्लास्टरला जंगल सफारीचे वेड आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात तो पाचव्यांदा आला. वारंवार ताडोब्याला येण्याचे कारण विचारले असता मी मजा करण्यासाठी येतो.

येथे आल्यावर मला घरासारखे वाटते अशी प्रतिक्रिया मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने दिली. चार दिवसांपासून येथे मुक्कामी असलेला सचिन रविवारी (ता. ७) नागपूरहून मुंबईसाठी रवाना झाला. मास्टर ब्लास्टर, भारतरत्न सचिन तेंडुलकरला क्रिकेट सोबतच जंगल सफारीचा छंद आहे.

sachin
Railway: बदनापूर रेल्वेस्थानकावर एक्स्प्रेस थांबणार कधी; रेल्वे प्रशासनाचा कायम दुजाभाव

देश, राज्यातील अनेक व्याघ्र प्रकल्पांत त्याने मनसोक्त सफारी केली आहे. मात्र, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघांनी त्याला सर्वाधिक भुरळ पाडली. आजपर्यंत त्याने ताडोबाची पाच वेळा सफारी केली आहे.

प्रत्येक सफारीमध्ये वेगवेगळा अनुभव येत असल्याने ताडोबात सफारीचे पुन्हा पुन्हा नियोजन करीत असल्याचे सचिनने सांगितले. यावेळी पाचव्या जंगल सफारीचे नियोजन बुद्ध पौर्णिमेला केले. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी ताडोब्यात प्राणीगणना होते. त्याचा वेगळा अनुभव घ्यायचा होता. गुरुवारी आल्या आल्या लहान ताराचे दर्शन झाले.

सचिनच्या चार दिवसाच्या सफारीमध्ये लहान ताराशिवाय मोगली, युवराज तथा भाणुसखिंडीच्या पिल्लांचे दर्शन झाले. वाघांच्या दर्शना सोबतच अस्वल, रानडुक्कर, हरिण, सांबर, कोल्हे, रानगवा आदी प्राण्यांचा मुक्त संचार अनुभवता आला.

sachin
भाजपच्या बड्या नेत्यानं वाचविलं काँग्रेसचं सरकार; काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांची खळबळजनक कबुली

मात्र बिग फाइव्ह म्हणून व्याघ्र प्रेमीमध्ये प्रसिद्ध असलेली भानुसखिंडी व तिचे चार बछड्यांचे एकत्रित दर्शन झाले नाही. सफारीत आलेल्या वेगळ्या अनुभवाने सचिन आनंदित दिसत होता. रिसोर्टवरून निघण्यापूर्वी डॉ.अंजली हिने रिसोर्टमधीलच शॅापीतून काही खरेदी केली.

सचिन तेंडुलकर फाउंडेशनतर्फे अलिझंजा येथील जिल्हा परीषद शाळेत बॅग वितरणाचे चांगले वार्तांकन केल्याबद्दल उपस्थित पत्रकारांचे त्याने आभार मानले. मास्टर ब्लास्टर सचिन, पत्नी अंजली आणि त्याचे काही मित्र कोलारागेट येथील बॅाम्बू रिसोर्ट येथे मुक्कामी होते. रविवारी सगळे सहा वाजता नागपूरकडे रवाना झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.