मुंबई: उद्योगपती अंबानी यांच्या घराबाहेर कारमध्ये स्फोटके सापडली होती. त्या प्रकारानंतर कारचा मालक मनसुख हिरेन याचा संशयास्पद मृत्यू झाला. स्फोटकांच्या प्रकरणात वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे याला NIAने ताब्यात घेत चौकशी केली आणि नंतर अटकही केली. मनसुख मृत्यूप्रकरणाचा तपास महाराष्ट्र ATS करत होते. पण दोन दिवसांपूर्वी त्याचाही तपास NIAकडे सुपूर्द करण्यात आला. या प्रकरणाचा तपास NIAकडे आल्यानंतर त्यांनी रविवारी बीकेसी परिसरातील मिठी नदीत शोधकार्य सुरू केलं. या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होताना दिसत आहेत. आता एका सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आणखी खुलासा झाला आहे.
समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या माहितीनुसार, मनसुख हिरेननं आपली स्कॉपिओ विक्रोळीमध्ये थांबवली आणि तो सीएसटीला आला होता. त्यानंतर हिरेन आणि सचिन वाझे यांची एका काळ्या रंगाच्या मर्सिडीज कारमध्ये ९ मिनिटं चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
या सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे की, काळ्या रंगाच्या गाडीतून ९ मिनिटांनी मनसुख हिरेन बाहेर पडतात आणि रस्त्याच्या पलीकडे जाऊन एक टॅक्सी पकडतात. त्यानंतर मनसुख हिरेन या परिसरातून निघून जातात. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. आता या गाडीत बसून सचिन वाझे आणि मनसुख हिरेन यांनी नेमकी कशावर चर्चा केली. याचा तपास आता NIA करत आहे.
बीकेसीच्या मिठी नदीत NIAची शोधमोहिम
या प्रकरणाचा तपास NIAकडे आल्यानंतर त्यांनी रविवारी बीकेसी परिसरातील मिठी नदीत शोधकार्य सुरू केलं. स्फोटकांच्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या सचिन वाझेने गुन्ह्यातील महत्वाचे पुरावे मिठी नदीत फेकल्याचे समजले. त्यानंतर NIA ने रविवारी दुपारी मिठी नदीत शोधमोहिम राबवली. NIAच्या टीमबरोबरच सचिन वाझेलाही या ठिकाणी नेण्यात आलं होते.
मनसुख हिरेन याच्या हत्येच्या तपासासाठी NIAने डायव्हर्ससह स्थानिक मच्छिमारांचीही मदत घेतली. या खाडीत वाझेने पुरावा म्हणून वापरता येऊ शकेल असे काही सीसीटिव्हींचे डिव्हीआर टाकल्याची माहिती NIAला मिळाली होती. त्या आधारावर डायव्हर्सनी मिठी नदीत बराच वेळ शोधमोहिम राबवली. सुमारे दीड तासांच्या शोझकार्यानंतर मिठीनदीच्या खाडीतून कॉम्प्युटरचे दोन सीपीयु, एकसारखेच रजिस्ट्रेशन नंबर असलेल्या दोन नंबर प्लेट, एक हार्ड डिस्क ड्राइव्ह आणि इतरही काही महत्त्वाच्या गोष्टी सापडल्या. याशिवाय, डायव्हर्सना खाडीतून दोन डीव्हीआर, एक लॅपटॉप, एक प्रिंटरही सापडला असल्याची चर्चा आहे.
सचिन वाझे आणि त्याचे काही सहकारी यांनी मनसुख हिरेनची हत्या केली आणि त्यानंतर हा सारा प्रकार उघडकीस येऊ नये यासाठी पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने काही बाबी मिठीनदीत फेकल्या अशी माहिती NIAला मिळाल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर NIAने शोधकार्य हाती घेत महत्त्वाच्या गोष्टी ताब्यात घेतल्या. या गोष्टी हस्तगत केल्याने तपासाला अधिक गती मिळेल अशी चर्चा आहे.
Sachin vaze and mansukh hiren 9 minutes discussion in mercedes car cctv footage
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.