मिस्टर इंडियाचा (Mister India) किताब पटकवणारा प्रसिद्ध बॉडी बिल्डर मनोज पाटीलने (manoj patil) आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली. या प्रकरणात मनोज पाटीलने अभिनेता साहिल खानवर गंभीर आरोप केले होते. साहिल खानकडून (sahil khan) मानसिक त्रास दिला जात आहे. धमक्याही (Threaten) दिल्या जात असल्याचा आरोप मनोजने केले आहेत. या प्रकरणी साहिल खानने आता मौन सोडले आहे.
मनोज पाटीलने केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नासाठी दोषी असल्याचा आरोप केलेल्या साहील खानने आपली बाजू मांडली आहे. इंडिया टूडेने दिलेल्या वृत्तानूसार यावेळी त्याने आपण या प्रकणात पुराव्यानीशी सर्व गोष्टी समोर आणणार असल्याचे सांगितले. "मी श्री.मनोज पाटील यांच्या आत्महत्येमध्ये माझे नाव घेण्यात आले आहे आणि म्हणूनच मला आज माझी बाजू समोर आणायची आहे. मला पुराव्यासह खरे सत्य आणि माझे नाव घेतले गेले याचे खरे कारण सांगायचे आहे. त्यानंतर जर कोणाला असे वाटत असेल की, माझे स्पष्टीकरण आणि पुरावे पुरेसे नाहीत, तर कायदेशीर व्यवस्थेला योग्य ती कारवाई करु द्या, पण जर इतर कोणी चुकीचे सिद्ध झाले तर त्याच्यावर कायदेशीर कारवाईही झाली पाहिजे" असे म्हणत साहील खानने या प्रकणाला नवे वळण दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.