Sakal Imapct : ...अखेर अंधेरी RTO प्रशासनाची अतिक्रमणावर कारवाई; जेसीबीने हटवल्या झोपड्या

Sakal Imapct
Sakal Imapct
Updated on

मुंबई : सकाळ माध्यमाच्या पाठपुराव्यामूळे पाच वर्षांपासून सुरू असलेल्या अतिक्रमण आरटीओ अधिकाऱ्यांनी मंगळवारी जेसीपीच्या सहाय्याने तोडले आहे. या झोपड्यामध्ये असामाजीक तत्वांकडून अवैध मद्य उत्पादन, जुगार, उघड्यावर मद्य सेवन करण्याच्या घटना सातत्याने होत होत्या.

शिवाय, झोपड्यातील कचऱ्याचे ढिगारे सोसायटीच्या सुरक्षा भितीला लागून तयार करण्यात आल्याने, संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली होती. यासंदर्भात स्थानिकांनी अंधेरी आरटीओ प्रशासनाला वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या.

Sakal Imapct
ST Bank : एसटी बँकेतील गैरव्यवहाराची चौकशी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने करावी; काँग्रेसची मागणी

अंधेरी आरटीओ कार्यालयातील अधिकाऱ्यांनी मंगळवारी दोन तास राबवलेल्या धडक कारवाई मोहीमेत परिवहन विभागाच्या जागेतील अतिक्रमण जेसीबीने तोडले आहे. बेकायदा पद्धतीने झोपड्या उभारून त्यामध्ये अवैध धंदे सुरू असल्याचा स्थानिक नागरिकांनी आरोप केला होता. यासंदर्भात 'सकाळ'ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर आरटीओ प्रशासनाच्या कारवाईला वेग आला होता.

त्यानंतर मंगळवारी अंधेरी आरटीओचे प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार यांच्या आदेशावरून मोटार वाहन निरिक्षक उमेश देवरे यांनी त्याच्या आरटीओ विभागातील पथकाने अतिक्रमणावर कारवाई केली.

Sakal Imapct
Ashadhi Wari 2023: वारकऱ्यांसाठी खुशखबर; राज्य सरकारची मोठी घोषणा

दुपारी ३.३० वाजताच्या दरम्यान अतिक्रमण काढायला सुरूवात केली. त्यानंतर सुमारे ५.३० वाजेपर्यंत अतिक्रमण काढण्याची मोहिम सुरू होती. आरटीओच्या जागेच्या सुरक्षा भिंतीला लागुन असलेल्या सोसायटींच्या दिशेने उभारण्यात आलेल्या झोपड्या जेसीपीच्या सहाय्याने पाडण्यात आल्या असून, इतर राहिलेल्या अतिक्रमण हटविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका प्रशासनाला आरटीओ प्रशासनाने पत्रव्यवहार केला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मोकळ्या जागेवर लवकरच आयअँन्डसी सेंटर उभारण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे. त्याशिवाय या जागेच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षकांच्या नियुक्तीची मागणी करण्यात आली आहे. यापुढे अतिक्रण होणार नाही. संपुर्ण जागा मोकळी राहून त्याचा वापर परिवहन विभागाच्या उपक्रमांसाठीच केली जाणार आहे.

- अशोक पवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी, अंधेरी

गेल्या पाच पेक्षा जास्त वर्षांपासून याठिकाणी अवैध झोपड्या उभारल्या जात आहे. धक्कादायक म्हणजे, कचऱ्यांचे उकीरडे त्यांनी इथे तयार केले, त्यामधून दुर्गंधीचे वातावरण तयार झाले. असामाजीक तत्वांकडून बेकायदा कामे इथे होत होती. सकाळ माध्यमाने या प्रकरणाला लावून धरल्याने, अखेर आम्हाला न्याय मिळाला आहे. सकाळ माध्यमांचे आम्ही आभारी आहे.

- जयश्री पितळे, रहिवासी वात्सल्य सोसायटी, अंधेरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.