Sakal Mahabrands 2023: सुशीलकुमार शिंदे महाराष्ट्राचे ब्रँड - फडणवीस

सकाळ माध्यम समुहाच्या ब्रँड्स ऑफ महाराष्ट्र या कार्यक्रमात उद्योजकांना प्रोत्साहित करताना फडणवीस बोलत होते.
sushilKumar Shinde_Devendra Fadnavis
sushilKumar Shinde_Devendra Fadnavis
Updated on

Sakal Mahabrands 2023 : : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे महाराष्ट्राचे ब्रँड असल्याचं विधान उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

सकाळ महाब्रँन्ड्स कार्यक्रमात उद्योजकांना प्रोत्साहित करताना फडणवीस बोलत होते. यावेळी राज्यातील विविध ब्रँड्सच्या प्रतिनिधींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. (former Maharashtra CM Sushil kumar Shinde Brand of Maharashtra says Devendra Fadnavis)

sushilKumar Shinde_Devendra Fadnavis
India GDP: भारताचा GDP 3.75 ट्रिलियन डॉलरवर! ब्रिटन, फ्रान्स आणि रशियाला भारतानं टाकलं मागे

फडणवीस म्हणाले, "महाराष्ट्र स्वतःचं एक ब्रँड आहे. आज देशातील सर्वात प्रगतीशील राज्य म्हणून महाराष्ट्राकडं पाहिलं जातं. देशाच्या जीडीपीत १५ टक्के वाटा असलेला महाराष्ट्र. देशाच्या उत्पादनात २३ टक्के वाटा असलेला महाराष्ट्र, देशाच्या निर्यातीत २२ टक्के वाटा असलेला महाराष्ट्र तसेच देशाच्या एफडीआयमध्ये २९ टक्के वाटा असलेला महाराष्ट्र. देशात पहिली ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी बनेल असा महाराष्ट्र देशातला ब्रँड आहे" (Latest Marathi News)

sushilKumar Shinde_Devendra Fadnavis
Cyclone Biparjoy: पुढील 12 तास महत्वाचे! 'बिपरजॉय' धारण करणार रौद्ररुप; 'या' भागासाठी IMDच्या सज्जतेच्या सूचना

"महाराष्ट्रातील जे ब्रँड आहेत त्यांना ओळख देण्याचा हा कार्यक्रम असून यामध्ये सकाळ समुह हा देखील एक ब्रँड आहे. सामाजिक बांधिलकी राखून विविध क्षेत्रात सकाळनं काम केलं आहे. त्याचबरोबर हे ही म्हणावं लागेल की, महाराष्ट्राचे माजी मुख्यंमत्री सुशीलकुमार शिंदे हे एक ब्रँड आहेत. तसेच सोनाली कुलकर्णी या देखील ब्रँड आहेत," अशा शब्दांत फडणवीसांनी यावेळी सर्वांचं कौतुक केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.