मुंबई : घडाळ्याचा काट्यावर दररोज मुंबई धावते. आजपर्यंत अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या, मात्र मुबईला वेळ दाखवणाऱ्या सीएसएमटीवरील २६ हेरिटेज घड्याळाची टिकटिक आजपर्यत बंद झालेली नाही.
विशेष म्हणजे कोरोना सारख्य संकट काळातही २६ हेरिटेज घड्याळांना चावी देण्याचे काम रेल्वे कर्मचारी- अधिकाऱ्यांकडून केले जात होते. सीएसएमटी स्थानकावरील २६ हेरिटेज घड्याळावर प्रकाश टाकणार सकाळ रिपोर्ट.....
युनिस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर दीडशे वर्षापेक्षा जास्त कालवधीपासून मुंबईकरांना आणि रेल्वे कर्मचारी -अधिकाऱ्याना अचूक वेळ दाखविण्याचे काम सीएसएमटी स्थानकावर असलेल्या २६ हेरिटेज घड्याळे करत आहे.
सीएसएमटी इमारतीवरील विशाल टॉवर क्लॉकसह आणि स्थानकावर विविध ठिकाणी या हेरिटेज घड्याळ आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हेरिटेज इमारतीवरील एक टॉवर घड्याळ , स्टार चेंबर मिनी टॉवर घड्याळ, प्लॅटफॉर्म क्र. २ व ३ आणि ४ व ५ दरम्यानचे संयुक्त दोन घड्याळ आणि उर्वरित जॉन वॉकर घड्याळे आहे.
ऐतिहासिक टॉवर क्लॉक
जागतिक वारसा लाभलेल्या छत्रपती शिवाजीमहाराज टर्मिनसच्या इमारतीवरून ब्रिटिशांनी ऐतिहासिक टॉवर क्लॉक १८८८ रोजी बसविण्यात आलेली होती. गेल्या १३५ वर्षांपासून मुंबईकरांना वेळ दाखविण्यासाठी निरंतर ही घड्याळ सुरू आहे.
कोरोनासारख्या संकटकाळातही संपूर्ण मुंबई ठप्प होती. मुंबईची जीवनवाहिनी स्तब्ध उभी होती. मात्र, मुंबईला या कठीण काळातसुद्धा वेळ दाखवणारे ऐतिहासिक टॉवर क्लॉक सुरू होती. यांची जबाबदारी मध्य रेल्वेतील कर्मचारी महेंद्र सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर होती.
१५० किलोची हेरिटेज घड्या
सीएसटीच्या मुख्य इमारतीच्या टॉवरला ही घड्याळ १३५ वर्षांपासून जुनी आहेत. या घड्याळीचे वजन १५० किलो असून ही घड्याळ चावीवर चालते. या टॉवर क्लॉकची उंची १० फूट आहे, त्यातील मिनिटकाटा साडेतीन फूट तर तास काटा अडीच फुटाचा आहे. या घड्याळाला एकदा चावी दिली, की चार ते पाच दिवस सुरू राहते. त्यानंतर पुन्हा चावी दिली जाते.
मिनी टॉवर घड्याळ
हे घड्याळ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हेरिटेज बिल्डिंग घड्याळासारखेच आहे. या घड्याळाचा व्यास 3.28 फूट किंवा 1 मीटर आहे. बांधकाम आणि ऑपरेशनल वैशिष्ट्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हेरिटेज घड्याळाप्रमाणेच आहेत. हे वजनावर आधारित, यांत्रिक घड्याळ आहे. हे घड्याळ स्टार चेंबर येथे आहे. या घड्याळात ५० किलो वजनाचे मुख्य चकती (wheel) आणि दोन पुलीवर आधारित गियर प्रणाली आहे.
संयुक्त घड्याळ-
दोन महाकाय घड्याळ लोकल ट्रेनच्या प्रवाशांना वेळेचे दाखविण्यासाठी लावण्यात आले आहे. प्लॅटफॉर्म क्र. २-३ आणि ४-५ वरून जाणाऱ्या लाखो उपनगरीय प्रवाशांना वेळ दाखवणारे हे घड्याळ आहे. १९२५ च्या आसपास ज्या वेळी इलेक्ट्रिक ट्रेन सुरू झाल्या त्याच वेळी बसविण्यात आले होते. या घड्याळ्यांचा व्यास ११ फूट आहे.हे घड्याळ इलेक्ट्रोमेकॅनिकल ऑपरेशनवर आधारित आहे.
जॉन वॉकर घड्याळ
हे पूर्णपणे यांत्रिक, वजनावर आधारित पेंडुलम घड्याळ आहे. हे ५ किलो वजनाचा समावेश असून, चकतीच्या स्पिंडलला गाइड करतो, ज्यामुळे घड्याळाचे काटे फिरतात. हे वजन सतत खाली जात राहते, जे दर 3 दिवसांनी अथवा अधिक अचूकपणे ७५ तासांनी समायोजित करणे आवश्यक आहे. रेल्वेमध्ये त्याची स्थापना १९०७ ते १९१० या वर्षात केली असावी असे मानले जाते. येथे वारसा मूल्य प्रतिबिंबित करणारे आणि वेळेचे महत्त्व दर्शवणारे २३ हेरिटेज घड्याळे विविध अधिकारी कक्षात कार्यरत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.