‘सकाळ सन्मान सोहळा’; माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या सेवाव्रतींचा सन्मान!

Nitin Gadkari
Nitin Gadkari sakal media
Updated on

मुंबई : कोरोनाचे संकट (corona pandemic) ओसरल्याने हळूहळू जनजीवन सावरायला लागले आहे. कोरोना संकटकाळात जाती-धर्माच्या पलीकडे जात अनेक माणसे जोडली गेली. समाजातील असंख्य ‘देवदूत’ (corona warriors) मदतीसाठी धावून आले. उद्‌ध्वस्त झालेल्या जीवनचक्राला गतिमान करण्यासाठी त्यांनी उचललेला खारीचा वाटा मानवी जीवन समृद्ध करून गेला. ‘सकाळ’च्या (sakal) ५१ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘कनेक्टिंग डॉट्‌स’ (connecting dots) संकल्पनेअंतर्गत अशा सेवाव्रती संस्था आणि व्यक्तींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येणार आहे.

Nitin Gadkari
"रिक्षा खरेदी करताना पार्कींग विचारली जाते, मग 'कार'साठी का नाही?"

विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवारी, २५ मार्च रोजी सायंकाळी ४.३० वाजता जुहू येथील मुकेश पटेल ऑडिटोरियममध्ये हा ‘सकाळ सन्मान सोहळा’ रंगणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी सोहळ्याचे प्रमुख अतिथी असतील. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आदी मान्यवर विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहणार आहेत.

हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील नामांकित चेहरेही सत्कारमूर्तींच्या सेवेला दाद देण्यासाठी सोहळ्यात आवर्जून सहभागी होणार आहेत. त्याव्यतिरिक्त राजकीय, प्रशासकीय, वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी कोरोना काळात बजावलेल्या अमूल्य सेवाकार्याचा यथोचित गौरव करण्यात येणार आहे.

Nitin Gadkari
नालासोपारा : पाच सराईत आरोपींना अटक; १६ गुन्हे उघड

सोहळ्यादरम्यान रंगणारी मनोरंजनाची मेजवानी ‘सकाळ’च्या वर्धापनदिनाची खास भेट असेल. अभिनेत्री अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी, पूजा सावंत, मानसी नाईक, अभिनेता सिद्धार्थ खिरीद आदी छोट्या-मोठ्या पडद्यावरील कलाकारांच्या कला सादरीकरणाने कार्यक्रमाची रंगत वाढेल. कार्यक्रमाचे प्रक्षेपण ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर करण्यात येणार आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळूनच सभागृहात प्रवेश देण्यात येईल.

पत्रकारितेबरोबरच समाजहिताचा वसा

पत्रकारितेचा वसा जोपासताना त्याही पलीकडे जाऊन समाजहितासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवण्यात ‘सकाळ’ कायम अग्रेसर राहिला आहे. त्याच अनुषंगाने आजवर प्लास्टिकमुक्तीसाठी जनजागरण, अवयवदानाच्या संकल्पनेला प्रोत्साहन, हृदयरोगाविषयी जनजागृती करणारे ‘आर्ट ऑफ हार्ट’ अभियान, कर्करोगाची वाढती समस्या लक्षात घेऊन ‘होप ऑफ लाईफ’ आदी अनेक उपक्रम ‘सकाळ’ने राबवले आहेत. गेल्या वर्षी कोरोना पश्चात रुग्णांसाठी ‘अनमास्किंग हॅपीनेस विथ मास्क’ नावाने एक चळवळ राबवली गेली.

‘सकाळ’च्या सर्वच उपक्रमांना लाखोंच्या संख्येने वाचकांनी प्रतिसाद दिला आहे. आताही संकटकाळात माणसे जोडणारी आणि त्यांना पुढे घेऊन जाणारी ‘कनेक्टिंग डॉट्‌स’ संकल्पना ‘सकाळ’ने राबवली आहे. त्याअंतर्गत होणाऱ्या कार्यक्रमात कोरोनाच्या कठीण काळात मदतीसाठी धावणाऱ्या आणि माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या सेवाव्रतींचा सन्मान करण्यात येत आहे.

सकाळ सन्मान सोहळा २०२२

कधी : शुक्रवार, २५ मार्च २०२२

केव्हा : सायंकाळी ४.३० वाजता

कठे : मुकेश पटेल ऑडिटोरियम, एन. एम. आय. एम. एस. कॉलेज, विलेपार्ले (प.), मुंबई.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.